महाराष्ट्र 14 न्यूज, (दि,०२ऑक्टोबर) :- सांगवी भागातील कृष्णा चौका नजीक असणाऱ्या सोसायटी बाहेरील डीपीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि त्या आगीच्या ठिणग्या मोठ्या प्रमाणात खाली पडत होत्या प्रसंगावधान राखून विशाल क्षीरसागर यांनी एमएसईबी ऑफिसला फोन केला. तेथील ऑपरेटर तुषार रगतवार यांनी फोन उचलून कार्य तत्परता दाखवत त्वरित घटनास्थळी त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच संतोष सर्जे, निलेश सूर्यवंशी आणि सागर बुरडे हे दाखल झाले, त्यांनी तेथील सर्व परिस्थिती लक्षात घेता त्वरित क्षणाचाही विलंब न लावता प्रथमता डीपी बंद करून बाजूची वाळू घेऊन आगेवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि सर्व डीपीचे क्षेत्र जागेवर नियंत्रित केले पहाटे सकाळची वेळ असल्यामुळे सर्व नागरिक गाढ साखर झोपेत होते. वरिष्ठांनी सांगवी विद्युत विभागास लागणारे मनुष्यबळ आणि साधनसामग्री वेळेत पुरविल्यास अशा दुर्घटना घडणार नाहीत.
मोठी दुर्घटना घडले असते त्याचं गांभीर्य लक्षात घेऊनच ही कार्यतत्परता दाखवली तिथे असलेले स्थानिक नागरिकांनी दिलीप पाटील, सुरेश ठाकूर आणि राजेश साळुंखे घटनास्थळी होते, या सर्वांनी विशाल क्षीरसागर यांचे आभार मानले.
विशाल क्षीरसागर यांनी दिली माहिती पुढीलप्रमाणे सकाळी पहाटे पावणे सहा वाजायच्या सुमारास मी कृष्णा चौकात चहा पिण्यासाठी गेलो असता मला तिथे एमएसईबीच्या ट्रान्सफॉर्मर वर मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र विद्युत महामंडळ विभागाला फोन करून मी कळवले असता एम एस ई बी चे कर्मचारी संतोष सर्जे, निलेश सूर्यवंशी, आणि सागर बुरुडे त्वरित घटनास्थळी हजर झाले. आणि त्यांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळून सर्व डीपी जागेवर नियंत्रित केला आणि सर्व आग विझवण्यात आली.घटनास्थळी असलेले दिलीप पाटील सुरेश ठाकूर आणि राजाभाऊ यांनी सर्वांनी मदत केली.