महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मार्च) : चिंचवडच्या भाजप उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदार म्हणून निवड होणार हे निश्चित असल्याने त्यांच्या चाहत्यांनी त्यांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयाच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर होताना दिसत आहेत.
उद्या ०२ मार्च ला निकालात जनतेचा कौल समजणार आहे. मात्र याआधीच अश्विनी जगताप यांचे आमदार म्हणून होर्डींग्ज लागल्याने एकच चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, काही खासगी संस्थांमार्फत केलेल्या सर्व्हेमध्ये अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा करत थेट फ्लेक्सबाजीला सुरूवात केली आहे.
तर भाजपच्या वतीने सर्व सन्माननीय नगरसेवक स्वीकृत नगरसेवक व पदाधिकारी यांनी उद्या (०२ मार्च) कुठल्याही प्रकारचे, डीजे सिस्टीम लावणे, बँड वाजवणे, फटाके वाजवणे,गुलाल उधळणे इत्यादी प्रकारचे जल्लोष उत्साहाच्या भरात करू नये, लक्ष्मण जगताप यांच्या दुःखद निधनानंतर ज्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली आहे त्या अनुषंगाने विजयाचा जलोष न करता मतदारांचे आभार मानायचे आहेत आणि त्यांच्याप्रती आपल्या सदभावना व्यक्त करायचा आहे. असे आवाहन करण्यात आले आहे.