Categories: Editor ChoiceTravel

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ‘ टेस्ट’ची कटकट संपली ! या एका सर्टिफिकेटवर License मिळेल , सरकारने बदलले नियम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ जुलै) : ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी आता तुम्हाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) फेर्‍या मारण्याची गरज नाही, लांब रांगामध्ये उभे राहण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याचे नियम बनवले आहेत.

▶️Driving License साठी चाचणीची गरज नाही

ड्रायव्हिंग लायसन्सच्या (Driving License) नियमात केलेल्या सुधारणांनुसार आता तुम्हाला आरटीओला (RTO) भेट देऊन कोणत्याही प्रकारच्या ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे नियम अधिसूचित केले आहेत, हे नियम या महिन्यापासून लागू झाले आहेत.

या नव्या बदलामुळे आरटीओच्या ड्रायव्हिंग परवान्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये पडून असलेल्या कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

▶️ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जावून प्रशिक्षण घेणे आवश्यक

वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे ही, आता आरटीओमध्ये जाऊन वाहन परवाना घेण्यासाठी चाचणीची गरज नाही. मात्र, अर्जदारांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठी ते कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण स्कूलमध्ये ड्रायव्हिंग परवान्यासाठी स्वत:ची नोंदणी करु शकतात. त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. अर्जदारांना ड्रायव्हिंग स्कूलद्वारे प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येईल.

▶️नवीन नियम काय आहेत

प्रशिक्षण केंद्रांबाबत रस्ते व परिवहन मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटी देखील आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे. चला हे समजून घेऊया.

1. अधिकृत एजन्सीने हे सुनिश्चित केले पाहिजे की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी किमान एक एकर जमीन, मध्यम आणि अवजड प्रवासी वस्तू वाहने किंवा ट्रेलर्ससाठी प्रशिक्षण केंद्रासाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.

2. प्रशिक्षक किमान 12 वी पास असावा आणि किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, रहदारीच्या नियमांमध्ये तो पारंगत असावा.

3. मंत्रालयाने अध्यापन अभ्यासक्रमही हे शिक्षण निर्धारित केले आहे. हलकी मोटार वाहने चालविण्यासाठी, कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त 4 आठवडे 29 तासांपर्यंत असेल. या ड्रायव्हिंग सेंटरचा अभ्यासक्रम दोन भागात विभागला जाईल. थेरी आणि प्रॅक्टिकल.

4. लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहर रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ आणि उतारावर वाहन चालविणे इ. चालविण्यास शिकण्यात 21 तास घालवावे लागतात. थेरी भागात संपूर्ण कोर्सच्या 8 तासांचा समावेश असेल, त्यामध्ये रस्ते शिष्टाचार, रस्ता रेज, ट्रॅफिक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि इंधन कार्यक्षमतेचा समावेश असेल.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

12 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

19 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago