महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ जानेवारी २०२३) : नविन वर्षाची सुरुवात अत्यंत भयानक झाली आहे. नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी तालुक्यात मुंढेगावात असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म कपंनीत मोठा स्फोट झाला आहे.
येथे स्फोटामुळे लागलेली आग अजूनही धुमसत असताना. सोलापूरच्या बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट(Blast in Barshi Firecracker Factory) झाला आहे. यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. मात्र, याबाबतचे अधिकृत वृत्त अद्याप समोर आलेले नाही. या स्फोटात 6 ते 7 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूरच्या बार्शीच फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 9 जण मरण पावल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांनी ही माहिती दिली आहे. मात्र, प्रशासनाने त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाहीत. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील ही घटना घडली. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाच हा स्फोट झाला. स्फोटावेळी कारखान्यात 40 कामगार काम करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी तालुक्यात मुंढेगावात असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म कपंनीत मोठा स्फोट झाला. अजूनही इथली आग अनियंत्रित आहे. या स्फोटात दोघा महिलांचा मृत्यू झाला आहे. 17 जखमी, चौघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या कंपनीतील बॉयलर फुटल्याची चर्चा परिसरात आहे.. तर केमिकल टँकर्सचा स्फोट झाल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये त्याचे हादरे जाणवले. स्फोटनंतर कंपनीला लागलेली आग मोठ्या प्रमाणात पसरली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…