Google Ad
Editor Choice

नवी सांगवीतील साई चौक ते फेमस चौक दरम्यान रखडलेल्या रस्त्यास तात्पुरती मलमपट्टी …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : नवी सांगवी तील फेमस चौक ते साई चौक या प्रभाग क्रमांक ३१ मधील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण चे काम मनपाच्या वतीने हाती घेण्यात आले होते, परंतु दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रीटीकरण चे काम करून मध्येच हे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे, त्यामुळे या भागातील मुख्य रस्ता खराब झाल्याने या रस्त्यावर ये जा करणाऱ्यांना अनेक दिवस खड्डे तसेच धुळीस सामोरे जावे लागत होते व दररोज अनेक अपघात होत होते अनेक महिला आणि जेष्ठ नागरिक घसरून पडले, त्यामुळे या भागातील नागरिक तसेच ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ ने याबद्दल मनपा दरबारी आवाज उठवला, जागा मालकांनीही नागरिकांची गैरसोय होऊ नये या करीता आराखड्यानुसार रस्ता करण्यास  हरकत नसल्याचे मनपास कळविले होते व तसे निवेदनही दिले होते. मनापाच्या दर सोमवारी होणाऱ्या जनसंवाद सभेमध्ये हा रस्ता तात्पुरता तरी ठीक करा अशी मागणीअनेकांनी केली होती.

या मागणी नंतर त्यास मनपाच्या वतीने सदर ठिकाणच्या रस्त्याचे काम हे मनपा आराखड्यानुसार व्हावे अशी जागा मालकाने मागणी केली असल्याचे उत्तर दिले व सदर ठिकाणी भूसंपादन झाल्यावर काम करणे शक्य होईल असे कळविले. तसेच सध्या मनपाचा कारभार हा प्रशासकाच्या हाती असल्याने विलंब होत होता. 

Google Ad

पिंपरी चिंचवड मनपाचे असे उत्तर आल्यानंतर या भागातील नागरिकांनी ‘ह प्रभाग क्षेत्रिय अधीकारी यांच्याकडे’ सदर रस्ता हा केव्हा करायचा तेव्हा करा, पण पावसाळ्यापूर्वी त्याची तात्पुरती दुरुस्ती किंवा डांबरीकरण करावे अशी मागणी केली व तसे निवेदन दिले. त्यानंतर संबंधित अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करून साई चौक ते फेमस चौक या दरम्यान असलेल्या रस्त्याचे तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण करून वाहनचालक आणि नागरिकांना दिलासा दिला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!