Google Ad
Editor Choice

टॅटू काढणे आले अंगलट , १४ तरुणांना HIV ची लागण … घटनेने शहरात खळबळ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ ऑगस्ट) : येथील एका infected HIV घटनेने अवघे उत्तर प्रदेश आणि काही प्रमाणात देशातही खळबळ उडाली आहे.14 जणांनी आपल्या अंगावर टॅटू गोंदवला त्यांनांतर त्यांना एचआयव्ही या विषाणूची लागण झाल्याची, डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. या 14 जणांनी एकाच ठिकाणाहून टॅटू गोदवून घेतला होता. ज्या व्यक्तीने त्यांना टॅटू गोंदवला त्याने निष्काळजीपणे एकच सूई सर्वांचे टॅटू काढताना वापरली होती.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, infected HIV सर्व लोकांनी नुकताच आपल्या शरीरावर टॅटू गोंदवला होता. टॅटू गोंदवल्यानंर हे सर्व जण सुरुवातीला किरकोळ आजारी पडले. पुढे हे आजारपण वाढत गेले. त्यांना सर्दी,ताप, थंडी खोकला अशी लक्षणे दिसू लागली. त्यांनी वैद्यकीय उपचार केले. मात्र, कोणताच फरक पडत नव्हता. त्यांचे वजनही मोठ्या झपाट्याने कमी होत होते. डॉक्टरांनी त्यांची रक्ततपासणी केली असता त्यांना एचआयव्ही विषाणूची लागण झाल्याचे पुढे आले. एकाच वेळी इतक्या लोकांना आणि समान लक्षणांनी एचआयव्ही लागण झाल्याचे पुढेआल्याने डॉक्टरांनी अधिक चौकशी केली.

Google Ad

चौकशीत पुढे आले की, infected HIV सर्वांनी एकाच ठिकाणी जाऊन टॅटू गोंदवले होते. हा टॅटू गोंदवताना कोणत्याही प्रकारे काळजी घेण्यात आली नव्हती. सूईसुद्धा बदलण्यात आली नव्हती. परिणामी एकाच वेळी सर्वांना ही लागण झाली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!