Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

भाजप युवा मोर्चाचा इशारा : मेट्रो बैठकीत नामकरणाचा मुद्दा घ्या; भाजपा युवा मोर्चाचे आयुक्तांना साकडे! – मेट्रोचे नाव‘‘पिंपरी-चिंचवड, पुणे मेट्रो’’ करावे!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८सप्टेंबर) : पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरू आहे. मोरवाडी ते दापोडी दरम्यान मेट्रो धावणार आहे. शहरात मेट्रो असताना केवळ पुणे मेट्रो असे संबोधन वापरले जात आहे. हा पिंपरी-चिंचवडमधील शहरवासीयांचा अपमान आहे. त्यामुळे पुणे मेट्रोचे नाव आता ‘‘पिंपरी-चिंचवड, पुणे मेट्रो’’ करावे. तसेच, मेट्रो विभाग अधिकारी आणि राज्य सरकार यांच्या बैठकीत हा मुद्दा घ्यावा,  अशी मागणी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी केली आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्वीकृत सदस्य संदीप नखाते, युवा मोर्चा सरचिटणीस तेजस्विनी कदम, युवती सहसंयोजिका सारिका माळी आदी उपस्थित होते.

Google Ad

याबाबत माहिती देताना संकेत चोंधे म्हणाले की, शहरात मेट्रो असताना केवळ पुणे मेट्रो असे संबोधन वापरले जात आहे. मेट्रोचा मोठा पट्टा पिंपरी-चिंचवडमध्ये असताना तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहकार्य असताना फ्लेक्स, जाहिरात, स्टिकर सर्वत्र पुणे मेट्रो असेच संबोधन वापरले जात आहे. विविध स्थरावर शहरावर नेहमीच अन्याय होत असून कोणत्याही माध्यमातून दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. मेट्रो विभाग अधिकारी आणि राज्य सरकार यांच्यात होणाऱ्या बैठकीत नामकरणाचा मुद्दा मांडून पुणे मेट्रोचे नाव ‘‘पिंपरी-चिंचवड, पुणे मेट्रो’’ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

…तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही!

पुणे मेट्रोमध्ये आपल्या शहराचा मोलाचा वाटा असूनसुद्धा जर आपल्या शहराला डावलले जात असेल आणि शहाराच्या अस्मितेवरच घाला घातला जात आहे. याबाबत यापूर्वी आंदोलन करण्यात आले आहे. विविध पातळीवर लेखी निवेदने दिले असून पाठपुरावा सुरु आहे. शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन नामकरण करावे. तसे झाले नाही पक्षासह शहरवासीयांना रस्त्यावर उतरून तीव्र नांदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही संकेत चोंधे यांनी दिला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

52 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!