Google Ad
Editor Choice

फेरीवाल्यांचे पुर्नवसन ( हॉकर्स झोन ) करून … नंतरच कारवाई करा – पिंपरी युवासेना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना काळानंतर एकीकडे व्यवसाय व उद्योगधंदे पूर्वपदावर येत असताना महापालिकेकडून पथारीधारक,भाजीविक्रेते व हातगाडी फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेकडून सर्व फेरीवाले,भाजीविक्रेते व पथारीधारक यांचा नव्याने सर्वेक्षण करून त्यांना हाॅकर्स झोनची आखणी करून द्यावी …

त्याबाबतचे धोरण तयार असूनदेखील अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसून भाजीविक्रेते,पथारीधारक व हातगाडीवर व्यापारीवर्गावर कारवाई करण्यापूर्वी त्यांची नोंदणी करून पुनर्वसन करण्यात यावे व त्यानंतर नियमबाह्य व्यवसायिकांवर कारवाई करावी असे निवेदन पिंपरी युवासेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग अधिकारी श्री. इंगळे ह्यांना देण्यात आले. ह्या वेळेस पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके, सामाजिक कार्यकर्त्यां शीलामामी जाधव, सुनील झिटे, अनिकेत घुले, जीवन चलवारे, संकेत जावळकर, लश्मी भंडारे, मोजेस अंतोनी, रंजना कांबळे उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

55 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!