Google Ad
Editor Choice Education

शिवाजी विद्यामंदिर , औंध प्रशालेत होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी टॅब वितरण सोहळा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० सप्टेंबर) : पुण्यातील औंध येथील श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेत काही दिवसांपूर्वी राबविलेल्या गृहभेट या उपक्रमादरम्यान मोबाईल नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत असे आढळून आले, या विद्यार्थ्यांना ‘Hope For Children Foundation’ या संस्थेच्या सहकार्यातून एकूण 3 ते 3.50 लाख रुपये किंमतीचे टॅब प्रशालेत पालक आणि विद्यार्थ्यांना आमंत्रित करून वितरित करण्यात आले.

या संस्थेच्या संस्थापिका परदेशात स्पेन याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या कॅरोलिन मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच खूप सहकार्य लाभले. टॅब हातात मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या प्रशालेविषयीच्या भावना आणि विश्वास यांचं नात दृढ झालं.

Google Ad

‘ फक्त शैक्षणिक वापरासाठीच या टॅब चा विद्यार्थ्यांनी वापर करायचा,तुम्ही सर्व विद्यार्थी हुशार आहात सर्वाना शुभेच्छा ‘ असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कॅरोलीन यांनी सांगितले. ‘शाळा विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविते त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होतो,या टॅबचा शैक्षणिक वापरासाठी विद्यार्थ्यांना योग्य उपयोग होईल त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल’ असे प्राचार्य राजू दिक्षित यांनी सांगितले. यावेळी औंध गावच्या सामाजिक कार्यकर्त्या शारदा पुलावळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका भारती पवार यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा चंदनशिवे, मिनल घोरपडे, वर्षा बोत्रे , विद्या धुमाळ, सुषमा असवले, वर्षा बोत्रे, अशोक गोसावी, रावसाहेव शिंदे, शंकर बोराटे सर्व शिक्षक,शिक्षिका भगिनी तसेच शिक्षकेत्तर सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले.

अजूनही काही विद्यार्थी मोबाईल नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत असे आढळल्यास प्रशालेतर्फे मदत केली जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिपीन बनकर यांनी केले .मिनल घोरपडे यांनी आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!