Google Ad
Uncategorized

दापोडीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न! माजी विद्यार्थी व शिक्षकांकडून जुन्या आठवणींना उजाळा …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१जून) : पिंपरी चिंचवड शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दापोडी या शाळेचा १९९६ – ९७ या वर्षातील बॅचच्या शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक २८ मे २०२३ आनंदात व उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींनी शिक्षकांचे स्वागत त्यांचे औक्षण करून, तर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात सर्व शिक्षकांचे वाजत गाजत शाळेच्या प्रवेशद्वारात स्वागत केले. शिक्षक व्यासपीठावर येताना सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या चरणावर पुष्प पाकळ्या वाहून स्वागत केले. हा अभूतपूर्व सोहळा अनुभवताना सर्व शिक्षक आणि विद्यार्थांचे अश्रू अनावर झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संस्थापक बा. ग. जगताप व स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी स्वर्गीय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या आठवणींनी सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले.

Google Ad

मेळावा, संमेलन म्हटलं की भाषणे ही आलीच परंतु कमिटीने या परंपरेला छेद देत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे चर्चा सत्र आयोजित केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना शिक्षकांनी दिलखुलास उत्तरे दिली. शिक्षकांनी आपल्या उत्तरात सांगितले की वयाच्या या टप्प्यावर कला, क्रीडा, छंद आणि व्यायाम याचा अवलंब करणे किती गरजेचे आहे. या चर्चा सत्राचे उपस्थित शिक्षकांनी मनापासून कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सौ. कल्याणी उपाध्ये – कुलकर्णी मॅडम यांनी सांगितले की मराठी भाषा, मराठी शाळा, जागतिक पातळीवर असणारी स्पर्धा आणि विकसित तंत्रज्ञान याची सांगड घालण्याची जबाबदारी केवळ शिक्षकच नाही तर आजी माजी अशा सर्वच विद्यार्थ्यांची आहे.
उपस्थित शिक्षकांचा सन्मान कमिटी सदस्य आणि वर्ग प्रतिनिधींनी श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देवून करण्यात आले.कार्यक्रमाचा समारोप झाल्यावर सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सर्व विद्यार्थ्यांनी डी.जे. च्या तालावर ताल धरत मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोअर कमिटी, वर्ग प्रतिनिधी आणि सर्व माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. १९९६ – ९७ च्या बॅच मधील सर्व विद्यार्थ्यांचे या स्नेह संमेलनाच्या सोहळ्याचे पंच कृषीतूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!