जहांगीर हॉस्पिटल च्या मधुरा दाते यांनी सांगितले आपत्कालीन वैद्यकीय (medical emergency) परिस्थितीमध्ये तातडीचे उपचार म्हणून सीपीआरचा वापर केला जातो. यामुळे हार्ट अॅटॅक (Heart Attack) आलेल्या आणि श्वास कोंडलेल्या एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. सदर प्रशिक्षण हे जहांगीर हॉस्पिटल च्या वैद्यकीय टीम चे माध्यमातून देण्यात आले. सोबत हृदयविकार ची लक्षणे, कोणाला हृदय विकार झटका आला तर त्याला काय मदत करावी , CPR कसा द्यावा, तो देताना काय काळजी घ्यावी ह्याची पूर्ण माहिती दिली गेली.
स्वदेश सेवा फाउंडेशन अध्यक्ष आणि चांगुलपणा ची चळवळ च्या सदस्य धनश्री पाटील यांनी सांगितले की चांगुलपणा ची चळवळ ही डॉ ज्ञानेश्वर मुळे, परराष्ट्र मंत्रालय निवृत्त सचिव , सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी चालू केलेले अभियान आहे. ज्या मध्ये समाजोपयोगी कार्य करणाऱ्या २५० पैकी जास्त संस्था एका व्यासपीठावर आणल्या गेल्या आहेत. गणेश उत्सव काळात अनेक नागरिकांना गर्दी मध्ये, मिरवणुकीत हृदय विकाराचे झटके आल्याचे निदर्शनास आले आहे. अश्या वेळी ढोल पथकातील युवकांनी हे प्रशिक्षण घेतले तर नक्कीच अनेकांचे प्राण वाचवून जीवनदान मिळू शकेल असे आम्हाला वाटले म्हणून चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत जहांगीर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण आम्ही युवा वाद्य पथक मधील सदस्यांना देता येईल का या बद्दल चर्चा केली . युवा वाद्य चे संस्थापक वैभव वाघ यांनी हा उपक्रम पथकातील वादकांसाठी करावा ही इच्छा व्यक्त केली. ॲड अनिश पाडेकर ॲड मनीष पाडेकर यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण आयोजित केले गेले.
युवा वाद्य पथक हे फक्त ढोल ताशा पथक नसून अनेक सामाजिक उपक्रमात सतत अग्रेसर राहिले आहे. करोना काळात देखील युवा वाद्य पथकाने ६ लाख पेक्षा जास्त फूड किट वाटप, प्लाझ्मा लीग या मध्ये सुमारे हजार प्लाझ्मा डोनर मिळवून देण्यासारखे अनेक सामाजिक उपक्रम केले आहेत. खऱ्या अर्थाने युवा वाद्य पथक चे सदस्य हे चांगुलपणाच्या चळवळीचे सदस्य आहेत.
सदर प्रशिक्षण घेणाऱ्या अनेक प्रशिक्षणार्थी चे जवळचे नातलग , मित्र परिवार यांनी हृदयविकाराने जीव गमावला आहे. आम्हाला जर हे ज्ञान त्या वेळी असेल असते तर आम्ही त्यांचा जीव वाचवू शकलो असतो परंतु आता आम्ही हे प्रशिक्षण घेऊन नक्कीच गरजून ची मदत करू असे मत युवा वाद्य पथकातील काही सभासदांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…