Google Ad
Editor Choice

स्वच्छता पंधरवडा निमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत पुणे जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता शपथ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१एप्रिल) : पर्यावरणपूरक जीवनमान जगणे हा आधुनिक जीवनाचा मंत्र आहे. यासाठी आपण शहर स्वच्छतेचा संकल्प करत आहोत. या संकल्पपूर्तीसाठी प्रत्येकाने सहभाग घ्यावा, कच-याचे वर्गीकरण करावे तसेच वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त आणि सुजलाम-सुफलाम बनविण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. माधव कनकवळे , जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा सामान्य रुग्णालय पुणे यांनी स्वच्छतेची शपथ घेताना केले.

सध्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी कर्मचा-यांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. यादृष्टीने हरित शपथ आणि स्वच्छता शपथेचेही यावेळी सामुहिक वाचन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर बनविण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निरोगी सदृढ आयुष्यासाठी स्वच्छता खूपच महत्वाचा घटक आहे, आणि ती ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे .

Google Ad

स्वच्छ सर्वेक्षणातील पिंपरी चिंचवड मधील आजवरच्या मानांकनात नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा मोलाचा वाटा राहिला असून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत ‘माझं शहर, माझा सहभाग’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून नागरिकांच्या सर्वेक्षणातील सहभाग वाढीवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून भर देण्यात येत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात १५० नागरिक , वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन अभियानाला सुरुवात केली आहे .

सदर प्रसंगी डॉ वर्षा डोईफोडे , अति. जिल्हा शल्यचिकित्सक , डॉ .संतोष देशपांडे , वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क , डॉ. प्रकाश रोकडे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक , श्री. सुनील टोणपे , पोलीस निरीक्षक , सांगावी पोलीस स्टेशन, श्री गिरी , प्रशासकीय अधिकारी व इतर रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!