Categories: Uncategorized

‘स्वच्छता ही सेवा’ … नवी सांगवीत स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक तास स्वच्छतेसाठी या अभियांनातर्गत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘1 तारीख 1 तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

शासनाच्या निर्देशनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने एक तास स्वच्छतेसाठी या अभियानांतर्गत रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. औंध जिल्हा रुग्णालयातील आवारात पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेतील आरोग्य अधिकारी कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, सर्व आस्थापना, स्वयंसेवी संस्था, विविध संघटना, विद्यार्थी, मंडळे, गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘स्वच्छता हीच सेवा’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत पिंपरी चिंचवड शहर आयुक्त शेखर सिंह यांच्या आवाहनानुसार औंध जिल्हा रुग्णालय परिसर तसेच नवी सांगवी येथील फेमस चौक ते शनी मंदिर येथे एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने नागरिक, आरोग्य अधिकारी, कर्मचारी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रविवारी १ ऑक्टोबर रोजी नवी सांगवी-पिंपळे गुरव प्रभागामधील जिल्हा रुग्णालय तसेच नवी सांगवी येथील फेमस चौक ते शनी मंदिर येथे एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये नागरी सहभागातून कचरा संकलनाच्या व्यापक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी स्वच्छते विषयी शपथ घेतली.

▶️नवी सांगवीत स्वच्छता सेल्फी पॉईंट :-

स्वच्छता ही सेवा, 1 तारीख 1 तास या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबवितानाच नवी सांगवी तील शनी मारुती मंदिर परिसरात सेल्फी पॉइंटही उभे करण्यात आले होते. या पॉईंटचा विविध अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित पत्रकारयांनी छायाचित्र घेत स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदविला.

Maharashtra14 News

Share
Published by
Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवडमध्ये जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद! ….- अवघ्या तीन दिवसांत ३५,००० हून अधिक बालकांचे लसीकरण पूर्ण

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ५ मार्च २०२५ : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय…

10 hours ago

पिंपरी चिंचवड शहरातील दहा पत्रकारांनी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेचे स्वीकारले सदस्यत्व

शहरातील दहा पत्रकारांनी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ…

21 hours ago

अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरास ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद पहिल्याच दिवशी ४८,७६३ जणांनी घेतला लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ फेब्रुवारी : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य…

5 days ago