Categories: Uncategorized

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक,०३ऑक्टोबर,२०२३: यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशस्वी संस्थेच्या आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले की, ‘जीवनामध्ये स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्व असून आपण सर्वांनी स्वच्छतेची सवय लावून घेतली पाहिजे. तसेच आपल्या सभोवतालचा परिसर व आपल्या कामकाजाची जागा स्वच्छ राहील यासाठी कटाक्षाने प्रयत्नशील राहायला हवे. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील दहा महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सदस्य यांच्यासह सुमारे चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते.चिंचवड येथील एल्प्रो चौक ते चापेकर चौक या मार्गावर स्वछताविषयक जनजागृतीच्या घोषणा देत,रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छता करत, कचरा संकलन करत विद्यार्थ्यांची फेरी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी प्रतिभा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. भरत कासार, आयआयसीएमआर चे संचालक डॉ. अभय कुलकर्णी,एटीएसएस चे संचालक डॉ. विश्वास स्वामी, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूटच्या प्रा.इरम शेख, ऐश्वर्या गोपालकृष्णन, महानगरपालिकेच्या नगरसेविका जयश्री गावडे,पालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक अंकुश झीटे,स्वच्छता निरीक्षक शशिकांत मोरे, आरोग्य अधिकारी राजू साबळे, आरोग्य सहाय्यक शालन करडे, आरोग्य मुकादम विजय नलावडे, परीक्षक पवन तांबे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी पवन शर्मा यांनी सर्वांना “आम्ही आपला परिसर आणि आपले शहर स्वच्छ ठेऊ आणि देशाचा मान राखू ..”अशी सामूहिक शपथ दिली.या स्वच्छता मोहिमेच्या आयोजनासाठी प्रा.डॉ. पुष्पराज वाघ, डॉ. वैभव पाटील व प्रा. प्रशांत वाडकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

या स्वच्छता मोहिमेत खालील शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या :-

१) यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) २) प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स ३) एएसएम सीएसआयटी ४) एटीएसएस, चिंचवड ५) आयआयसीएमआर, निगडी. ६) कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे आर.एम धाडीवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट,निगडी. ७) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट आकुर्डी. ८) विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी – पिंपरी चिंचवड शाखा. ९) प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिंचवड. १०) डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट, चिखली. ११) जेएसपीएम संस्थेचे राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, ताथवडे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम जलकुंडाची सोय

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…

31 mins ago

अतिरिक्त आयुक्तांनी विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांचा प्रभागनिहाय घेतला आढावा … पिंपरी चिंचवड महापालिकेची गणेशोत्सवपूर्व तयारी वेगात

महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५ :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त…

2 hours ago

जीवघेण्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा नवी सांगवीतील नागरिकांची मागणी … कुत्र्याच्या चाव्याने महिला ICU मध्ये

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 ऑगस्ट :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून…

11 hours ago

पिंपरी चिंचवडचा प्रयोद रजपूत बेस्ट बॉक्सरचा मानकरी … आता पिंपरी चिंचवड खेळाडूंचीही नगरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25ऑगस्ट :-- पिंपरी चिंचवडचा प्रयोद रजपूत बेस्ट बॉक्सरचा मानकरी ठरला आहे. पिंपरी…

13 hours ago

काम न करणाऱ्यांचेच फ्लेक्स जास्त असतात, म्हणत अजित पवारांचा पिंपरी चिंचवडकरांना इशारा… ज्याचे फ्लेक्स जास्त त्याचं बटन दाबू नका,

अजित पवारांनी आज चौफेर फटकेबाजी केली. मी बीडचा पालकमंत्री आहे. तिथले नागरिक म्हणतात तुम्ही अधून-…

21 hours ago

ध्वजपताका दिनांक १५ ऑक्टोबर पर्यंत पावसाळी वातावरणामुळे उतरविण्याचा महानगरपालिकेचा निर्णय..

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ ऑगस्ट २०२५ : चऱ्होली येथील वडमुखवाडी परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज…

1 day ago