महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ नोव्हेंबर) : निलमसंस्कृती फाऊंडेनचा सौजन्याने अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचे एक उदाहरण सौ.सुवर्णा ताई माने यांना समाज भूषण प्रेरणा गौरव पुरस्कार देण्यात आला. सौ.माने ताईंनी छोट्याशा खेड्यातून सुरवात केली असून आज ती मुळशीतील गाव गावात पोहचली आहे.. त्यांनी निलमसंस्कृती सोशल फाऊडेशनचा आधारवर महिलान रोजगाराची संधी निर्माण करून दिली आहे, गोरगरिबांना नेहमी हॉस्पिटल प्रॉब्लेम असो किंवा मुलांचे एडमिशन असो नेहमी मदतीची धाव घेऊन आधार देत असतात पीगी बँकेचा माध्यमातून लघु उद्योग सुरू करून बचत कशी करायची हे ही महिलांना मार्गदर्शन करण्यात आले आहे .
आज या उप्रमाअंतर्गत बऱ्याच महील आपल्या पायावर सक्षिम आहेत.. असे अनेक उपक्रम सौ माने ताईंनी राबवले आहे,महिला आरोग्य, महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर पाहता त्यांचा कामाची दखल घेऊन आधार सोशल फउंडेशन बेळगाव याचे अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी हा पुरस्कार देण्याचे जाहीर करून अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचा मानस कन्या डॉ सौ सुनीता माई मोडक यांचा हस्ते प्रधान करण्यात आला यावेळी प्रसिद्ध प्रवक्ते डॉ प्रकाश कदम, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे डॉ रवींद्र कुलकर्णी, डॉ सौ कल्याणी कुलकर्णी (मोडक), डॉ वाल्मीक वाघ, सौ प्रिया वाघ , डॉ काळूराम मालगुंडे, डॉ धोंडीबा कुंभार, डॉ संभाजी बन्ने, आदी मान्यवर उपस्थित होते…