Google Ad
Editor Choice

शिवप्रतापदिनीच सरकारकडून कबरीवर सर्जिकल स्ट्राईक …धडाकेबाज निर्णयाचं शिवप्रेमींसह इतिहासकारांनीही केलं स्वागत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० नोव्हेंबर) :प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझाल खान कबरीच्या भोवतीचं बांधकाम हा अनेक वर्षांपासून वादाचा विषय. मरणानंतर वैर संपतं, या तत्वानुसार अफझाल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानंच ही कबर बांधण्यात आली. पण काळाच्या ओघात कबरीभोवतीचं बांधकाम वाढत गेलं. इतकं की एका पत्र्याखाली मावेल इतकी छोटी कबर अचानक महालात रुपांतरित झाली. पण याच अनधिकृत बांधकामावर सरकारनं हातोडा मारला. आजच्याच दिवशी म्हणज 10 नोव्हेंबर 1659 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता. त्याच शिवप्रतापदिनाचा मुहूर्त साधत कबरीभोवतीच्या बांधकामावर हातोडा मारण्यात आला. सरकारचा हा सर्जिकल स्ट्राईक मानला जातोय.

घटनाक्रम समजून घ्या :

Google Ad

महाराजांच्या काळात बांधलेली अफझाल खानाची कबर ही काही फूट होती.

पण पुढे वनविभागाच्या एकरभर जागेवर अतिक्रमण करण्यात आलं आणि कबरीचं उदात्तीकरण झालं.

2006 मध्ये कबरीचा वाद कोर्टात गेला.

2009 मध्ये मुंबई हायकोर्टानं बांधकाम पाडण्याचे आदेश दिले

सुप्रीम कोर्टानंही हे आदेश कायम ठेवले.

कायदा सुव्यवस्थेचं कारण देत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.

अनधिकृत बांधकामावर हातोडा : महाराजांनी स्वराज्याचा शत्रू अफझल खानाची कबर बांधायचे आदेश दिले. धार्मिक सहिष्णुतेचं इतिहासातलं हे सर्वोत्तम उदाहरण. पण काळाच्या ओघात त्याच कबरीभोवती अतिक्रमण झालं, कबरीचं उदात्तीकरण झालं. पण शिवप्रतापदिनाचा मुहूर्त साधत सरकारनं अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला. ज्यादिवशी महाराजांनी अफझाल खानाचा कोथळा काढला त्याचदिवशी अफझलच्या कबरीभोवतीचा अनधिकृत भाग पाडण्यात आला. त्याचं शिवप्रेमींकडून स्वागत होतंय

दरम्यान, आजच्या कारवाईमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शिवप्रेमींकडून कौतुक केलं जातंय. महाराजांच्या काळात बांधलेली अफझाल खानाची कबर ही काही फूट होती. पण पुढे वनविभागाच्या एकरभर जागेवर अतिक्रमण करण्यात आलं आणि कबरीचं उदात्तीकरण झालं.

▶️सकाळच्या पहिल्या किरणासह कारवाई

आज शिवप्रतापदिनीच सरकारकडून कबरीवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. सकाळच्या पहिल्या किरणासह कारवाई सुरु झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या धडाकेबाज निर्णयाचं शिवप्रेमींसह इतिहासकारांनीही स्वागत केलं.

महाराजांनी स्वराज्याचा शत्रू अफझल खानाची कबर बांधायचे आदेश दिले. धार्मिक सहिष्णुतेचं इतिहासातलं हे सर्वोत्तम उदाहरण. पण काळाच्या ओघात त्याच कबरीभोवती अतिक्रमण झालं, कबरीचं उदात्तीकरण झालं. पण शिवप्रतापदिनाचा मुहूर्त साधत सरकारनं अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला. ज्यादिवशी महाराजांनी अफझाल खानाचा कोथळा काढला त्याचदिवशी अफझलच्या कबरीभोवतीचा अनधिकृत भाग पाडण्यात आला. त्याचं शिवप्रेमींकडून स्वागत होतंय.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!