Categories: Uncategorized

राहुल गांधींच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ ऑगस्ट) : मोदी आडनावाच्या बदनामी प्रकरणी सुरतच्या कोर्टाने राहुल गांधी यांना दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांच्या याचिकेवर आज, शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी न्या. भूषण गवई, न्या. पीएस नरसिम्हा आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने सूरत कोर्टाने दिलेल्या 2 वर्ष कारावासाच्या शिक्षेला स्थगिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निरीक्षण नोंदवताना, राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली, जी या प्रकरणात अधिक शिक्षा आहे. त्यामुळेच त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनी आपल्या आदेशात दोन वर्षांची शिक्षा का आवश्यक आहे, हे स्पष्ट केले नाही. या निर्णयामुळे (जास्तीत जास्त शिक्षेमुळे) एक जागा प्रतिनिधित्वाविना राहिली हे लक्षात घेण्यासारखे नाही का? हा विषय केवळ एका व्यक्तीच्या हक्कापुरता मर्यादित नसून, त्या जागेच्या मतदारांच्या हक्काशी संबंधित विषय आहे असे म्हटले. यावर युक्तीवाद करताना पुर्णेश मोदी यांचे वकील महेश जेठमलानी यांनी राहुल गांधींनी एकदाही खंत व्यक्त केली नाही, माफी मागितली नाही. म्हणजेच ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत, असा युक्तिवाद केला.

तर राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अद्यापपर्यंत वायनाडची (राहुल गांधींचा मतदारसंघ) पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही. कदाचित त्यांना खात्री असावी सुप्रीम कोर्टात विजय आमचा होईल म्हणून त्यांनी पोटनिवडणूक लावली नसावी असा युक्तीवाद केला होता. दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी, राहुल गांधी यांना या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी कुठला आधार वापरण्यात आला असा सवाल न्यायालयाकडून विचारण्यात आला. तसेच राहुल गांधींना कमी शिक्षा देखील दिली जाऊ शकत होती. न्यायाधीशांनी 1 वर्ष 11 महिन्यांची शिक्षा दिली असती तरी राहुल गांधी संसदेत अपात्र ठरले नसते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. या युक्तीवादानंतर अखेर राहुल गांधीच्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.

सूरत येथील सेशन कोर्टाने 23 मार्च 2023 रोजी राहुल गांधी मानहानी प्रकरणात दोषी ठरवल होते. यासोबतच त्यांनी 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर गुजरात उच्च न्यायालयाकडे या प्रकरणी शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणीला गुजरात हायकोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यासंदर्भात आज, शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हे राहुल गांधींच्या बाजूने तर सीनियर ऍड. महेश जेठमलानी यांनी तक्रारदार पूर्णेश मोदीतर्फे युक्तीवाद केला. दरम्यान राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांची खासदारकी बहाल होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

प्रभाग क्रमांक ३१ व ३२ मधील जनसामान्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी ०७ ऑगस्ट रोजी “आमदार आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि..04 ऑगस्ट :- पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याची जागेवरच…

12 hours ago

सावली … बेघरांच्या दुःखाला मायेची सोबत! …पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवारा केंद्र निराधारांसाठी ठरतंय आधार

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ ऑगस्ट २०२५ :* कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेलं, तर कुणी…

2 days ago

‘ कबुतरांच्या उच्छादाने सांगवीकर हैराण, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला केव्हा जाग येणार ? … नागरिकांचा संतप्त सवाल !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…

2 days ago

मुख्याध्यापक नसलेल्या शाळेत मनसेचे अभिनव आंदोलन रिकाम्या खुर्चीला हार घालून महापालिकेचे वेधले लक्ष

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…

2 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिका लावणार दर १० मीटरला एक देशी झाड! शहर हरित करण्यासाठी महापालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…

3 days ago

आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी … नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA), या डॉक्टर्स असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड शाखेने उचलले प्रेरणादायी पाऊल !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…

3 days ago