Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : सीरम मधून पहिला कोविशिल्ड साठीचा पुरवठा मुंबईत दाखल !

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्र सरकारने भारत आणि सीरमच्या दोन कोरोना लसींना परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीकरणासाठी लसीचे डोस वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम सुरु आहे.
पहाटे 5.30 वाजता मुंबईत या लसीचा पहिला साठा पोहचला असून मुंबईकरांची प्रतिक्षा आता संपली आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला साठा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने पुण्याहून मुंबईत आणला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे. इथून तो मुंबईतील वेगवेगळ्या केंद्रांवर लसीकरणासाठी पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळाले आहेत.

Google Ad

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

248 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!