Categories: Uncategorized

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची आत्महत्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑक्टोबर) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुनील कावळे 45 वर्ष अस आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याच्या बॅगेत सुसाईड नोट सापडली आहे.

सुनील बाबुराव कावळे असे त्याचे नाव असून जालना इथल्या चिकनगाव, अंबाड येथे राहत असल्याची माहिती आहे. आत्महत्या करणारा हा तरुण मुळाचा अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या  या आत्महत्येमुळे आता राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

नोटमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाकरिता मराठा समाजातील लोकांना दिनांक 24 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये एकत्रित होण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच नोटच्या शेवटी त्याने सर्वांची माफी देखील मागितली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

8 hours ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

2 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

3 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

1 month ago