महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑक्टोबर) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुनील कावळे 45 वर्ष अस आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याच्या बॅगेत सुसाईड नोट सापडली आहे.
सुनील बाबुराव कावळे असे त्याचे नाव असून जालना इथल्या चिकनगाव, अंबाड येथे राहत असल्याची माहिती आहे. आत्महत्या करणारा हा तरुण मुळाचा अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या या आत्महत्येमुळे आता राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

नोटमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाकरिता मराठा समाजातील लोकांना दिनांक 24 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये एकत्रित होण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच नोटच्या शेवटी त्याने सर्वांची माफी देखील मागितली आहे.