महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ ऑगस्ट) : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा हे रविवारी (दि. ६) पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते सहकार विभागाच्या एका पोर्टलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या वेळी देशभरातील बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठकही होणार आहे. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही या वेळी उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकारच्या सहकार विभागातर्फे सहकारी संस्थांना व्यवसाय सुलभता करण्यासाठी (ईज ऑफ डुईंग बिझिनेस) साह्य व्हावे, यासाठी केंद्रीय सहकारी संस्थांच्या निबंधकांनी तयार केलेल्या ‘सहकार से समृद्धी’ या पोर्टलचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय सहकार सचिव ज्ञानेश कुमार, विशेष सचिव विजय कुमार हेही उपस्थित असतील. या वेळी देशभरातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधीही हजेरी लावणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते, प्रतिनीधी इतर नागरीक उपस्थित राहणार असल्याने व्ही व्ही आय पी बंदोबस्ताच्या अनुषंगाने चिंचवड वाहतुक विभाग हद्दीतील मार्गावर वाहनांसाठी काही रस्ते बंद करणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता हे बदल करण्यात आले आहेत.
असे असतील वाहतुकीत बदल :-
१) महावीर चौक महावीर चौकाकडुन चिंचवडगांवाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी रस्ता सदरची वाहने ही महावीर चौक कडुन खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.
२) दर्शन हॉल लिंक रोड -लिंकरोड कडुन अंहिसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी रस्ता सदरचे वाहने ही मोरया हॉस्पीटल चौक कडुन इच्छित स्थळी जातील…
३) रिव्हर व्हयुव चौक- रिव्हर व्हयुव चौकाकडुन चाफेकर चौक, अहिंसा चौक बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी रस्ता सदरचे वाहने हे रिव्हर व्हीव चौकाकडुन वाल्हेकरवाडी, बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
वरील वाहतूक बदल दि.०६/०८/२०२३ रोजी सकाळी ०८/०० वाजता दुपारी १५/०० वा. पर्यंत अथवा वाहतुक सुरळित होईपर्यंत (अत्यावश्यक सेवेतील व कार्यक्रमासाठी येणारी निमंत्रीतांची वाहने वगळुन) सर्व प्रकारचे वाहने वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. असे काकासाहेब डोळे पोलीस उप-आयुक्त, परि २. अति. कार्य चाहतूक पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…