Google Ad
Editor Choice

भाजप शहराध्यक्ष ‘शंकर जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी यशस्वी आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०) : राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष आणि मा. उपमुख्यमंत्री (गृह / विधी व न्याय) यांच्या कार्यालयाच्या समन्वयाने पिंपरी चिंचवड शहरात थेरगाव, पिंपळे निलख, पुनावळे, वाकड अशा वेगवेगळ्या ठिकाणी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, आज (दि.२९) वाकड येथील चंद्ररंग सेरेनीटी सोसायटी, कस्पटे वस्ती मध्ये मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले, यात जवळपास २७८ रुग्णांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला.

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित रुग्णां ची विविध आजारांवर तपासणी करून त्यांचे निदान केले. या शिबिरात उपस्थित नागरिकांना विनामूल्य रोगनिदान, आवश्यक शस्त्रक्रियांची सुविधा, रक्त व लघवी चाचणी, ई.सी.जी. तपासणी आणि आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून मोफत सुविधा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे परिसरातील अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला.

Google Ad

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते  श्री.रणजीत कलाटे, श्री.गणेश कस्पटे, श्री.सोमनाथ कस्पटे, श्री.सुधीर कस्पटे,श्री.नितीन इंगवले, श्री.सुनील कस्पटे, सौ.स्नेहाताई कलाटे आणि इतर कार्यकर्त्यांनी अत्यंत परिश्रम घेतले. यामुळे शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यात यश मिळाले आणि डॉक्टरांच्या टीमने त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!