Google Ad
Editor Choice

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सक्सेस ग्रुप सांगवी व सुनेत्रा महिला प्रतिष्ठान आयोजित झाडे लावा बक्षिस मिळवा योजने अंतर्गत आकर्षक बक्षिसांचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जून) : ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सक्सेस ग्रुप सांगवी व सुनेत्रा महिला प्रतिष्ठान आयोजित झाडे लावा बक्षिस मिळवा या योजने अंतर्गत सहभागी झालेल्या सांगवीतील विद्यार्थी,नागरिक बंधु भगिनी यांना श्री.दिलीप तनपुरे सर व सौ.मंदाकिनी दिलीप तनपुरे यांनी त्यांच्या घरी जाऊन आकर्षक बक्षिसे देऊन त्यांना सन्मानित केले तसेच प्रभाग क्रं. ४६ सांगवी मध्ये ५ जुन २०२२ ते ११ जुन २०२२ पर्यंत संस्थेतर्फे पर्यावरण संवर्धन सप्ताह साजरा करण्याचे योजिले आहे.

यामध्ये वृक्ष रोपण,वृक्ष संवर्धन जनजागृती,स्वच्छता मोहिम योजनेत सहभागी होनाऱ्या नागरिकांचा सन्मान करने तसेच पर्यावरण संवर्धन सप्ताह मध्ये जेष्ठ नागरिक संघ,महिला बचत गट,विद्यार्थी ,गणेश मंडळ सामाजिक संस्था,भगनी मंडळ, यांच्या सहयोगाने पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबविले जाणार आहे.

Google Ad

जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे, “आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय – स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे.”

पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू असल्याचे ‘दिलीप तनपुरे सर’ यांनी सांगितले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!