Google Ad
Uncategorized

सांगवीत ‘सक्सेस ग्रुप व सुनेत्रा महिला प्रतिष्ठाण’ आयोजित दिपावली वसुबारस निमित्त सामूहिक गोमाता पूजन सोहळ्याचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ नोव्हेंबर) : दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसनिमित्त आमदार अश्विनीताई जगताप व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत  श्री गजानन महाराज मंदिरासमोर सांगवी येथे शेतकऱ्याची कामधेनू गायी आणि वासराचे सामूहिक गोमाता पूजन कार्यक्रमाचे आयोजन सक्सेस ग्रुप व सुनेत्रा महिला प्रतिष्ठाण यांच्या वतीने दिपावली वसुबारस निमित्त ०९ नोव्हेंबर ला करण्यात येणार आहे.

दिवाळीची खरी सुरुवात वसुबारस पासून होते. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो. यंदा 9 नोव्हेंबर रोजी वसुबारस सण साजरा केला जाईल. या दिवशी गाईची पूजा केली जाते. दिवाळीची चाहूल जवळ आल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. गाय ही शेतकऱ्याची कामधेनू असल्याने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसनिमित्त तिची यथासांग पूजा केली जाते.

Google Ad

भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्व असल्याने गाय आणि वासराचे पूजन करून वसुबारस साजरा केला जातो. त्यानुसार जुनी सांगवी येथील सक्सेस ग्रुप आणि सुनेत्रा महिला प्रतिष्ठानच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिरासमोर दिलीप तनपुरे व सौ. मंदाकिनी तनपुरे आणि मित्र परिवाराच्या वतीने वसुबारसनिमित्त सामूहिक गोमाता पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी गाय आणि वासराचे लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पूजन करून वसुबारस साजरी केली जाणार आहे, तरी परिसरातील महिला भगिनी, नागरीक बांधव यांनी भाग घेऊन दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन दिलीप तनपुरे व सौ. मंदाकिनी तनपुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं. अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. हा दिवस गायी आणि वासरांचा सन्मान,पूजा करण्यासाठी ओळखला जातो. ‘वसु’ म्हणजे गाय आणि ‘बारस’ म्हणजे बारावा दिवस, म्हणून वसु बारस हा शब्द आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!