Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नागरिकांच्या जीवासाठी खर्च करण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नाहीत म्हणून महानगरपालिकेची दिवाळखोरी जाहीर करावी … ‘प्रशांत शितोळे’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८मे ) : भारत सरकार व महाराष्ट्र शासन तसेच देशातील अन्य राज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार दुजाभाव करीत असून ज्यावेळी लस शोधण्यात विविध संस्थांना यश आले, त्यावेळी मात्र केंद्र सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाला मोफत लस देण्यात येईल असे जाहीर केले होते, हे आम्ही भारतीय म्हणून विसरलो नाहीत त्या बाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

या निवेदनात प्रशांत शितोळे यांनी म्हटले आहे की ‘गेल्या आठवड्यापासून भारत सरकार व विविध राज्य शासन यांनी लसी खरेदी करणे बाबत गोंधळ दिसून आहे . त्यामुळे ज्यावेळी शोध लागला त्यावेळी एक भारतीय म्हणून जे ऐकले होते ते पण खोटे होते याचे दुःख वाटते, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव आशिया खंडात श्रीमंतीच्या बाबतीत नावाजलेले आहे आणि आजही महानगरपालिकेकडे मुबलक पैसे आहेत. नुकताच महानगरपालिकेचा जवळपास 7000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजुरी झाला आहे .

Google Ad

गेल्या वर्षभरामध्ये कोरोना सारख्या महामारी साठी महानगरपालिकेने आज पर्यंत 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केलेला नाही आणि तो नागरिकांच्या जीवासाठी अर्थसंकल्पाच्या दहा टक्के सुद्धा नाही. गेल्या 4 वर्षात तर मोठ्या प्रकल्पांचे आकडे पाहिले तर सर्वसामान्यांना त्या आकड्यातील कोटींचे शून्य किती आहेत हे सुध्दा मोजता सुद्धा येणार नाहीत. आता मात्र त्याच सर्वसामान्यांच्या जीवावर आलेली वेळ आहे त्यामुळे याच श्रीमंत महानगरपालिकेने शहरातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आज रोजी आहे तसे मोफत केले पाहिजे.

महानगरपालिकेमध्ये जवळपास ४.५० लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अगदी ३० लाख लोकसंख्या अंदाजे गृहित धरली तरीही महानगरपालिका २५-३० कोटी रुपयांकडे बघणार नाही व त्या आर्थिक परिस्थितीची महानगरपालिका आहे असा आम्हाला आज तरी विश्वास आहे. महानगरपालिकेने लसीकरणाबाबत केंद्रशासन , महाराष्ट्र शासन यांचा काहीही निर्णय होवो त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी न ढकलता आपल्या शहरातील नागरिकांची जबाबदारी आपली सुध्दा आहे हे समजून प्रत्येक नागरिकाला तातडीने खरेदी करून घेण्याची परवानगी केंद्र शासनाने कडून घेऊन लसीकरणाची उपलब्धता करून घ्यावी व दोन महिन्यात शहराचे १००% लसीकरण करून घ्यावे अशी मागणी प्रशांत शितोळे यांनी केली आहे.

आपल्या महानगरपालिकेची परिस्थिती नागरिकांच्या आरोग्यसाठी व त्यांच्या जीवासाठी २५-३० कोटी रुपये खर्च करण्याची नसेल, तर मात्र महानगरपालिकेच्या आजच्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या जीवासाठी आम्ही काहीच खर्च करू शकत नाही आमची परिस्थिती तशी राहिली नाही म्हणून दिवाळखोरी जाहीर करावी म्हणूनही या पत्राद्वारे एक विनम्र आवाहन करीत आहे, असेही प्रशांत शितोळे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

254 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!