Google Ad
Uncategorized

जिल्हास्तरीय सीलंबन स्पर्धेत नवी सांगवीतील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण भरारी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १६ ऑगस्ट २३) : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते.”खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो निर्णयक्षमता, सहानुभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते या गुणांच्या बळावरच व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो” हे मोलाचे विचार घेऊन न्यू मिलेनियम स्कूलचे विद्यार्थी ५ वी पुणे जिल्हास्तरीय सीलंबन स्पर्धेत असा मोलाचा विचार घेऊन उतरले व या स्पर्धेत स्टिक फाईट मध्ये त्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची निवड ही वय, वजन, गटातून स्टिक फाईट साठी झाली आपले कौशल्य पणाला लावून स्पर्धेत एकूण 400 विद्यार्थी सहभागी झालेले होते त्यापैकी १३ विद्यार्थी हे न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलचे होते. त्या सर्व मुलांना यश प्राप्त झाले. अत्यंत चुरशीचा सामना असतानाही ४ गोल्ड मेडल, ७ ब्रॉन्झ मेडल, १ सिल्वर मेडल , १ अबसेन्ट असा विजय विद्यार्थ्यांनी खेचून आणला.

विजेते विद्यार्थी :-

Google Ad

हेतल जावळे ( गोल्ड मेडल), स्वरा देवकर ( गोल्ड मेडल), तेज बिटकर ( गोल्ड मेडल), प्रथमेश शेळके. मिताली फेंगडे (ब्रॉन्झ मेडल ) मनस्वी शिंदे (ब्रॉन्झ मेडल) , अदिती लांडगे (ब्रॉन्झ मेडल) , ऋषिका जगदाळे(ब्रॉन्झ मेडल) , स्वरा गायकवाड (ब्रॉन्झ मेडल) श्रेयश जगदाळे, (ब्रॉन्झ मेडल) जय पवार (ब्रॉन्झ मेडल), कृष्णा मंगलकर ( ब्रॉन्झ मेडल) आदित्य मिसार ( सिल्वर मेडल) स्वरा गायकवाड ( अबसेन्ट) यश खेचून आणलेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते. या स्पर्धेत यश खेचून आणल्याबद्दल विशेष आभार सुनील सांबारे यांचे आहे त्यांनी वेळोवेळी मुलांना मार्गदर्शन करून मुलांचे धैर्य व आत्मविश्वास वाढवला आणि म्हणूनच हे यश सहजरित्या मुलांच्या वाट्याला आले .

या स्पर्धेत यश प्राप्तीसाठी शाळेचे संचलन मंडळ ,क्रीडा शिक्षक शिक्षक ,यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचबरोबर संस्थेचे सचिव मा शंकर शेठ जगताप ,उपाध्यक्ष मा विजू अण्णा जगताप ,मा डॉ विकास पवार सर ,मा प्रा बामणे सर ,मा गोफणेसर ,मा स्वाती पवार मॅडम तसेच कॉलेजच्या प्राचार्य मा. इनायत मुजावर मॅडम, प्रायमरी मुख्याध्यापिका मा. जयश्री माळी मॅडम व्यवस्थापन समिती यांनीही मुलांचे कौतुक केले. अशा या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!