महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांत शाश्वत विकास प्रकल्पावर जे काम केले आहे आणि जर्मनीमध्ये जाऊन जे ज्ञान संपादन केले आहे ते कौतुकास्पद आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांच्या हातून पर्यावरणपूरक कार्य घडेल यात शंका नाही. या विद्यार्थ्यांच्या माध्यामातून जलसंवर्धन करण्याच्या दृष्टीने शहरात जनजागृती करण्यात येईल तसेच महाराष्ट्रात “पानी फाऊंडेशनच्या” वतीने जलसंवर्धनासाठी करण्यात आलेले वेगवेगळे उपक्रम, उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी अभ्यास भेटींचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात येईल असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले .
संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) नेमून दिलेल्या शाश्वत विकास (Sustinable Development Goals – SDG) हे ध्येय घेऊन, अभ्यास करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याचा जर्मनी अभ्यास दौरा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपन्न झाला. या दौऱ्यामध्ये पालिकेच्या कासारवाडी शाळेतील एकूण १० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आकांक्षा फाउंडेशन यांच्या वतीने चालवली जाणारी ही शाळा मागील दोन वर्षांपासून शाश्वत विकास प्रकल्पावर अभ्यास व संशोधन करीत आहे. ज्यामध्ये भारतात होणारा वार्षिक पाऊस, त्यावर परिणाम करणारे घटक व जलसंधारणाच्या पद्धती, जलसंधारण जनजागृती नियोजन, जलसंधारण तज्ञ्यांची मुलाखत घेणे आदी बाबींवर विद्यार्थी काम करीत आहेत.
जर्मनी अभ्यास भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी तेथील संस्कृती, तेथील पाणी व स्वच्छतेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, राबविले जाणारे प्रकल्पांची माहिती घेतली तसेच जर्मनी येथील विद्यार्थी, शिक्षकांसोबत संवाद साधला. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत छत्रपती शाहू इंग्लिश मीडियम स्कूलने पर्यावरणपूरक वेशभूषा करून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर निबंध स्पर्धेत ईशा पाटील या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
जर्मनी अभ्यास भेटीमुळे केनिया, नायजेरिया, अमेरिका येथील विद्यार्थ्यांसोबत मैत्री झाली. त्यांच्या देशातील शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धन प्रकल्पातील विविध बाबी समजून घेत्या आल्या असे विद्यार्थी प्रथमेश जाधवने सांगितले.भविष्यातही शाश्वत विकास प्रकल्प अविरतपणे राबविण्यात येतील, ज्यामध्ये विद्यार्थी, पालकांचा समावेश करण्यात येईल असे छत्रपती शाहू इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश परिजात म्हणाले.
या भेटीदरम्यान सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विद्यार्थी ताहुरा मणियार, श्रावणी टोंगे, गौरव पवार, क्षितिजा गुजर, ईशा पाटील, ताहुरा शेख, सई लांडगे, अथर्व भाईप, आयेशा मुस्तफा, प्रथमेश जाधव तसेच शिक्षिका फ्लोरिना फिलीप उपस्थित होते. यावेळी या मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आयुक्त शेखर सिंह यांचे आभार व्यक्त केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…