महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ जुलै) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने पालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच दमदार अशी कामगिरी केली आहे. विभागाने अवघ्या 90 दिवसांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त करदात्यांकडून तब्बल 447 कोटी रुपयांचा कर वसूल करून महापालिकेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे. तर प्रामाणिकपणे कर भरुन शहरविकासात योगदान देणाऱ्या नागरिकांचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.
शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा 6 लाख 2 हजार 203 नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा customised sms पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे 2023-24 च्या अवघ्या पहिल्या तिमाहीतच 447 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.
6 लाख 2 हजार 203 मालमत्ता धारकांना पैकी 3 लाख 3 हजार 350 मालमत्ता धारकांनी म्हणजे पन्नास टक्के मालमत्ता धारकांनी तीन महिन्यांत कराचा भरणा केला आहे. या मालमत्ता धारकांनी 447 कोटी 3 लाख 96 हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.
कर संकलन विभागाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व श्रेय जबाबदार, प्रामाणिक आणि जागरूक करदात्या नागरिकांना आहे. त्याबद्दल या सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. हा सर्व कररुपी पैसा शहराच्या शाश्वत विकासाचा पाया राहील याची मी ग्वाही देतो. या शहराच्या पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या होतील यावर मी वैयक्तिक लक्ष देत आहे.
:- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
गत वर्षीपासून आम्ही राबवत असलेल्या अनेक नावीन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रमाचे हे सांघिक यश आहे. हे करत असताना आम्हाला काही जप्तीसारख्या अप्रिय कारवाया कराव्या लागल्या असल्या तरी त्यामागे शहराच्या विकासाचे सूत्र आहे हे लक्षात घेतले पाहिजे. यातून हे शहर अधिक सर्वांगसुंदर, राहण्यासाठी सुखद होईल याची दक्षता घेतली जाईल.
:- प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
माहितीचे शुध्दीकरण, बीलांचे वेळेवर वाटप यासाठी आमचा प्रकल्प सिद्धी एक मैलाचा दगड ठरला आहे. “सिद्धीकडून वृद्धिकडे” ही टॅगलाईन बचत गटांच्या महिलांनी अक्षरशः खरी करून दाखवली. कर संकलन विभाग त्यांचा शतशः आभार आहे. या प्रकल्पाला आम्ही भविष्यात अजून उंचीवर नेणार आहोत. माहिती विश्लेषण, त्यावर सर्जनशील आकर्षक जनजागृती यासाठी फॉक्सबेरी यंत्रणेची आम्हाला भरीव मदत झाली आहे. शेवटी आमच्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची सांघिक कामगिरी मोलाची ठरली आहे. विभागातील कार्यक्षम कर्मचारी अधिकारी यांचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी एक भाग्ययोग आहे असे मी समजतो.
:- नीलेश देशमुख
सहायक आयुक्त,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…