Google Ad
Editor Choice

रविवारी मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध … रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचार बंदी, नाईट कर्फ्यू घोषीत!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ जानेवारी) : राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.

Google Ad

रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. राज्य सरकारचे नवे निर्णय नेमके काय-काय? उद्या मध्य रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचार बंदी. नाईट कर्फ्यू घोषीत. राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आलीय.

दिवसा ५ पैक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार. ५०% नाट्यगृह, सीनेमागृह राज्यातील हाँटेल आणि रेस्टाँरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद. दिवसा ५० % क्षमतेने सुरू रहणार. बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक.

उद्या मध्यरात्रीपासून राज्‍यात हे नवे नियम लागू :-

सकाळी ५ ते रात्री ११ राज्‍यात जमावबंदी लागू

रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत राज्‍यात नाईट कर्फ्यू

मैदाने उद्‍याने पर्यटन स्‍थळे बंद राहणार

रेस्‍टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्‍के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू राहणार

२ डोस पूर्ण झालेल्‍यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार

राज्‍यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्‍यांनाच परवानगी

खासगी कार्यालये ५० टक्‍के क्षमतेने सुरू राहतील

लग्‍नासाठी ५० तर अंत्‍यसंस्‍कारासाठी २० लोकांनाच परवानगी

हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

लग्‍न समारंभांसाठी ५० तर अंत्‍यसंस्‍कारासाठी २० लोकांनाच परवानगी

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!