Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भोसरीत उभारणार एसटीपी प्रकल्प – ॲड. नितीन लांडगे

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. २० जानेवारी २०२२) : भोसरी परिसरात मागील पंधरा वर्षात लोकसंख्येत खुपच वाढ झाली असून पाणीपुरवठ्यासह इतर आवश्यक यंत्रणेवर ताण वाढत आहे. गव्हाणे वस्ती येथील आदिनाथनगर भागात पावसाळ्यात मलनिस्सारणाचा प्रश्न भेडसावतो. आदिनाथनगर येथील पपिंग स्टेशन परिसरात पावसाळ्यात जमा होणा-या मैला पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भभवतात. यासाठी कै. अंकुशराव लांडगे नाटयगृहाशेजारील मोकळ्या चार हजार स्केअर फुट जागेत पुढील पंधरा वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन पाच एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रकल्प उभारण्यास गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

स्थायी समितीने यापुर्वीच या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अध्यक्ष ॲड.नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.  चक्रपाणी वसाहत, महादेवनगर, सद्गुरुनगर, भोसरी, धावडेवस्ती परिसरातील मैलापाणी आदिनाथ नगर येथील एसटीपी प्रकल्पात जातो. त्यामुळे तेथील सखल भागातील वस्त्यांमध्ये मैला मिश्रीत पाणी साठते.

Google Ad

आता कै. अंकुशराव लांडगे नाटयगृहाशेजारी नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ही समस्या कायमची मिटणार आहे. या नवीन एसटीपी प्रकल्पातील शुध्दीकरण केलेले पाणी भोसरी सहल केंद्रातील उद्यान व तळ्यात सोडता येईल. या प्रकल्पामुळे भोसरी पुर्व भागातील नागरीकांची सोय होणार असुन आरोग्य विषयक तक्रारी कमी होणार आहेत. या प्रकल्पास सुमारे अंदाजे र.रू. १३.१५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे अशीही माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अध्यक्ष ॲड.नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!