Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरात सांगवी फाटा येथे धनगर समाजच्या वतीने रास्ता रोको….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरात धनगर समाजच्या वतीने रास्ता रोकरण्यात आले. धनगर समाज st आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी मागील14 दिवसांपासून समाजाचे 6 बांधव पंढरपूर येथेआमरण उपोषण करत आहेत।त्यानां पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारने तात्काळ कार्यवाही करावी यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील धनगर समाज बांधव आक्रमक झाले.

सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य समन्वय समितीच्या आदेशानुसार सकल धनगर समाज पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने तहसीलदार याना निवेदन देण्यात आले. तसेच आज अहिल्यादेवी सेवा संघ सांगवी आणि सकल धनगर समाज पिंपरी चिंचवड यांच्या वतीने सांगवी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले.

Google Ad

यावेळी अहिल्यादेवी सेवा संघाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रांत आज रस्ता रोको आंदोलन करण्याचे समन्वय समितीने ठरवले होते. यानंतर पंढरपूर येथे मंगळवारी राज्यव्यापी निर्णायक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीही शहरातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहिले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!