Google Ad
Editor Choice india

देशात कोणकोणत्या राज्यांमध्ये लॉकडाऊन ? जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि नवे निर्बंध

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहा:कार उडालेला आहे. रोज लाखो रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील रुग्णसंख्येचा विचार करता केंद्रीय पातळीवर लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी केली जात आहे. तर देशभरात एकदाच लॉकडाऊन लागू करणे योग्य नसून तशी आवशक्यतासुद्धा नसल्याचे मत केंद्र सरकारचे आहे.

मात्र, असे असले तरी देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू तसेच इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात कोणत्या राज्यात सध्या काय निर्बंध आहेत?

Google Ad

▶️उत्तर प्रदेशमध्ये 10 मे पर्यंत लॉकडाऊन
उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. येथील आरोग्यव्यवस्था संपूर्णपणे कोलमडली आहे. येथे मृतांचे प्रमाणसुद्धा जास्त असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलेलीये. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये 10 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. येथे यापूर्वी शुक्रवारी रात्री 10 ते मंगळवार सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

▶️छत्तीसगडमध्ये 15 मे पर्यंत लॉकडाऊन
छत्तीसगड राज्यात मागील मंगळवारी 15 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे रुग्णसंख्या काहीशा प्रमाणात नियंत्रणात असल्यामुळे काही प्रमाणात सूटसुद्धा देण्यात आली आहे. रायपूर तसेच दूर्ग जिल्ह्यामध्ये संसर्ग नियंत्रणात आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये सूट दिलेली आहे.
छत्तीसगडमध्ये लगू केलेल्या लॉकडाऊनमध्ये गल्लीमधील किराना दुकाने उघडण्याची अनुमती देण्यात आली आहे. हे दुकान संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच खुले राहतील. तसेच येथे प्रत्येक रविवारी संपूर्ण लॉकडाऊन लागू असेल. या काळात अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व आस्थापना बंद असतील.

▶️बिहारमध्ये 15 मे पर्यंत लॉकडाऊन
बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील मुख्यंत्री नितीश कुमार यांनी मागील मंगळवारी येत्या 15 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. या काळात राज्य सरकारची सर्व कार्यालये, दुकानं खासगी कार्यालये बंद असतील. तसेच आवश्यक खाद्यवस्तू, फळभाजी, मांसविक्री, दूधविक्रीसाठी सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत करता येईल. रेल्वे तसेच हवाई प्रवासासाठी जाणारेच फक्त सार्वजिनक वाहतुकीचा वापर करु शकतील . या काळात शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस बंद असतील.

▶️ओडिसा येथे 19 मे पर्यंत लॉकडाऊन
ओडिसा राज्यात येत्या 19 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पोलीस कमिश्नर सौमेंद्र प्रियदर्शी यांनी सांगितल्याप्रमाणे राशन दुकान, मासे तसेच मांसविक्री, दूधविक्री करण्यासाठी दुपारी 12 वाजेपर्यंत वेळ असेल. या काळात लसीकरणाचा कार्यक्रम सुरु राहील.

▶️दिल्ली
दिल्लीमध्ये येत्या 10 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. मागील महिन्याच्या 19 तारखेपासून येथे लॉकडाऊन आहे.

▶️महाराष्ट्र
महाराष्ट्रात 1 मे रोजी ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊनसारखे नियम लागू करण्यात आले आहे. हे नियम येत्या 15 मे पर्यंत लागू असतील. कोरोना संसर्ग लक्षात घेऊन निर्बंधांचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

▶️पंजाब
येथे मिनी लॉकडाऊन, विकेंड लॉकडाऊन तसेच इतर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 15 मे पर्यंत नाईट कर्फ्युसुद्धा लागू करण्यात आलाय.

▶️राजस्थान
येथे 17 मे पर्यंत लॉकडाऊनसारखे नियम लागू करण्यात आलेयत.

▶️गुजरात
गुजरातमध्ये एकूण 29 शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. तसेच सार्वजनिक ठिकाणी जमण्यास येथे मनाई आहे.

▶️तमिळनाडू
येथे येत्या 20 मे पर्यंत सर्व राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीये.

▶️केरळ
केरळमध्ये 4 मे पासून मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. मिनी लॉकडाऊनचे निर्बंध येत्या 9 मे पर्यंत लागू असतील.

▶️कर्नाटक
येथे 27 एप्रिलपासून 12 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलाय.

▶️गोवा
कोरोना संसर्गामुळे गोव्यामध्ये 10 मे पर्यंत वेगवेगळे निर्बंध असतील. या काळात व्यावसायिक प्रतिष्ठान बंद असतील. तसेच राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी असेल. कलानगुटे आणि केंडोलीम सारखे पर्यटनस्थाळ बंद आहेत.

▶️आंध्र प्रदेश
येथे 6 मे पासून दोन आठवड्यांसाठी दुपारी 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अंशिक स्वरुपात कर्फ्यु असेल. याआधी येथे नाईट कर्फ्यू लागू होता.

▶️पुदुच्चेरी
येथे 10 मे पर्यंत लॉकडाऊन असेल.

▶️नगालँड
30 एप्रिल ते 14 मे पर्यंत कडक नियम तसेच अंशत: लॉकडाऊन असेल.
दरम्यान देशात अजूनही कोरोना लाट ओसरलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असे सांगण्यात येतेय.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!