Mumbai : राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे मा.मुख्यमंत्री ‘उद्धवजी ठाकरे’ यांचे हस्ते क्लँप मारुन उद्घाटन!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२६ जानेवारी ) : मुंबई-परिवहन विभागाचे डी वाय आरटीओ श्री. संजय ससाणे यांच्या पुढाकाराने आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व पिक्सलस्टेट यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा लघुपट स्पर्धेची घोषणा करण्यात आली. ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.

प्रथम पारितोषिक रु.३१०००/-, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय पारितोषिक रु.२१०००/-, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
त्रुतीय पारितोषिक रु.११०००/-, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तसेच वैयक्तिक
बेस्ट आऊटगोईंग फिल्म
बेस्ट डायरेक्टर
बेस्ट मेसेज फिल्म
बेस्ट ज्यूरी अवॉर्ड
बेस्ट अँक्टर
बेस्ट अँक्ट्रेस
बेस्ट चाईल्ड अँक्टर
बेस्ट रायटर
बेस्ट एडिटर
बेस्ट डिओपी
अशीही रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

याशिवाय चांगला मेसेज, चांगली फिल्म, टँग लाईन यांचे प्रदर्शनही आरटीओ मार्फत करण्यात येईल.
फिल्म जमा करण्याची शेवटची तारीख आहे १६ फेब्रुवारी २०२१
स्पर्धेच्या अधिक माहिती साठी खाली दिलेल्या सांकेतिक स्थळावर भेट द्यावी.

http://maharoadsafety.com/filmfestival2021/

मा.मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, अपर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पिक्सलस्टँट चे महेश मोटकर यांच्यासह परिवहन, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

21 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

1 day ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago