Categories: Editor Choice

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत 2,153 बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व भांडी संचाचे वाटप घरेलू कामगार, वाहन चालक, असंघटित कामगारांना अत्याधुनिक प्रशिक्षण विनामूल्य देणार – शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ सप्टेंबर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारातून  समाजातील शेवटच्या घटकातील, तळागाळातील सर्वसामान्य, कष्टकरी, गरजू नागरिकांपर्यंत केंद्र शासन असो, राज्य शासन असो अथवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल या सर्वांच्या कल्याणकारी योजना पोहचविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. त्यामाध्यमातून लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांचा जनसेवेचा वसा आणि वारसा अविरतपणे चालविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

पिंपळे गुरव येथील भाजप कार्यालयात अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत सुरक्षा संच आणि गृहोपयोगी भांड्यांचा संच वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुजरातचे आमदार तथा माजी मंत्री श्री. जयद्रथसिंह परमार, माजी आमदार श्री. महेश रावत, माजी आमदार श्री. राकेश शहा, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेविका सौ. उषा मुंढे, माजी नगरसेवक श्री. सागर आंघोळकर, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, श्री. नरेश जगताप, श्री. शशिकांत दुधारे, श्री. राहुल जवळकर, श्री. अमर आदियाल, श्री. दीपक काशीद, प्रभाग अध्यक्षा सौ. माधवी शिंदे, कामगार आघाडीचे अध्यक्ष श्री. नामदेव पवार, श्री. उमेश सकटे, श्री. मनोजकुमार मारकड, श्री. भारत मदने, श्री. संजय मराठे, श्री. दिलीप कांबळे सर, श्री. गणेश जगताप, श्री. साई कोंढरे, श्री. निलेश अष्टेकर, श्री. प्रसाद कस्पटे, श्री.शिवाजी कदम, श्री.राजू लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जगताप म्हणाले की, यापूर्वीही लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून शहरातील असंघटित कामगार, कष्टकरी वर्ग, घरेलू कामगार यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी विमा योजना, साहित्य वाटप तसेच आरोग्य सुविधा पुरविण्यासंदर्भात उपक्रम राबविण्यात आले होते. लक्ष्मणभाऊंनंतर हा उपक्रम यापुढेही अखंडपणे सुरू ठेवण्याची जबाबदारीही आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहोत. शहरातील सर्वसामान्य असंघटित कामगार, घरेलू कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या माध्यमातून  मागील वर्षी अटल सन्मान योजनेंतर्गत पिंपरीमध्ये साडे सात हजार कामगारांना गृहोपयोगी भांडी वाटप करण्यात आले होते. त्याचे नियोजन दीपक म्हेत्रे यांनी केले होते. तर सांगवीमध्ये मागील वर्षी २ हजार तर यावर्षी पुन्हा एकदा २,१५३ कष्टकऱ्यांना या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत या भांड्यांच्या संचचे वाटप करण्यात आले. याचे नियोजन अनिल कांबळे यांनी केले. त्याबद्दल कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी कौतुक केले.

भविष्यात आम्ही या घरेलू कामगार, सफाई कामगार, वाहन चालक यांना  एक विशेष प्रशिक्षण देणार आहोत. थोडक्यात घरेलू काम करणाऱ्या भगिनींना सध्या घरोघरी वापरण्यात येणारी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत ती उपकरणे कशी चालवावीत यासंदर्भात हे प्रशिक्षण असेल. त्याचबरोबर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्रही देण्यात येईल. जेणेकरून या भगिनींना त्यांच्या कामाचा चांगला मोबदला कामाच्या ठिकाणी मिळेल. अशाच पद्धतीचे प्रशिक्षण वाहन चालक असतील किंवा इतर कामगार त्यांनाही देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य आम्ही देणार असल्याचेही शंकर जगताप यांनी यावेळी सांगितले.

आतापर्यंत अनेक असंघटित कामगारांनी आपली नोंद केलेली नाही त्यामुळे ते अजूनही या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे या योजनेचा तसेच शासनाच्या इतरही योजनांचा  लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त असंघटित कामगारांनी आपल्या नावाची नोंद करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला भूलथापा द्यायचा प्रयत्न करतील. मात्र त्यांना तुम्ही मतपेटीतून उत्तर द्या, असेही आवाहन जगताप यांनी उपस्थित लाभार्थ्यांना यावेळी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमांची पाहणी…

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…

3 days ago

पुणे जिल्हा अथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने पहिल्यांदाच सांगवी येथे सौ.सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…

2 weeks ago

१५ ते १७ एप्रिल या कालावधीत पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहरासाठी …. महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…

3 weeks ago

पुणे मेट्रोच्या नावात पिंपरी चिंचवड नावाचा समावेश करा – आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…

3 weeks ago

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

4 weeks ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

1 month ago