Google Ad
Editor Choice Education

कला शिक्षक ‘बिपीन शिवराम बनकर’ यांना पुण्यातील आर्ट बिटस् महाराष्ट्र ” गुरु गौरव ” हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ सप्टेंबर) : पुण्यातील जनता शिक्षण संस्थेच्या औंध येथील श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, येथील कला शिक्षक आणि मोशी गावचे सुपुत्र ‘बिपीन शिवराम बनकर‘ यांना यावर्षीचा ” गुरु गौरव “ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फौंडेशन कडून हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात शालेय स्तरावर मुलांसाठी राबविलेल्या कलाविषयक उपक्रमांची, कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष पोपटराव देवकर तसेच जनरल सेक्रेटरी सुभाषराव गारगोटे , प्राचार्य राजू दिक्षित , पुणे जिल्हा कलाध्यापक संघ अध्यक्ष श्रावण जाधव यांनी अभिनंदन करून कलाक्षेत्रातील पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Google Ad

या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की आर्ट बिटस् ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबविले जातात.

या पुरस्काराबद्द्ल बोलताना, जनता शिक्षण संस्था सुभाषराव गारगोटे म्हणाले, … जनता शिक्षण संस्थेतील शिक्षक नेहमी नाविन्यपूर्ण कार्य करण्यात अग्रेसर असतात.संस्था आणि शाळा यांचे नाव उज्वल करणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते कला शिक्षक सातत्याने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याचे प्रामाणिकपणे कार्यरत असतात त्याचाच एक भाग म्हणून कला शिक्षक बिपीन बनकर यांना राज्यस्तरीय गुरू गौरव पुरस्कार आहे . संस्थेचे आणि शाळेचे नाव उज्वल करण्यासाठी आमचे कलाशिक्षक नेहमी अग्रेसर असतात.संस्थेला त्यांचा सार्थ अभिमान आहे.

एक कला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव देण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो . त्यामुळे अनेक विद्यार्थी चित्रकला आणि इतर कलेमध्ये प्राविण्य मिळवत आहेत.मी राबवित असलेल्या विविध उपक्रमांना संस्थेचे अध्यक्ष पोपटराव देवकर , जनरल सेक्रेटरी सुभाषराव गरगोटे.सर्व पदाधिकारी आणि प्रशालेचे प्राचार्य राजू दीक्षित तसेच कलाध्यापक संघ पुणे जिल्हाध्यक्ष श्रावण जाधव मला प्रोत्साहन देत असतात.त्यामुळे आम्हा शिक्षकांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी ऊर्जा मिळते . असे  –बिपीन बनकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!