Google Ad
Uncategorized

राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली … जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिरासाठी एक कोटी रुपये देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १६ फेब्रुवारी) : पुणे जिल्ह्यातील भंडारा डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी साऱ्या विश्वाला मार्गदर्शक असणाऱ्या गाथेची निर्मिती केली होती. भंडारा डोंगरावर अनेक धार्मिक सोहळे होतात. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक लोक या ठिकाणी गाथा पारायण सोहळा करण्यासाठी येतात . याकरिता भव्य मंदिर असावे, असे सर्व भक्तांना वाटत होते. आणि मनोकामना डोळ्यासमोर ठेवून भंडारा डोंगर समितीने तुकाराम महाराजांच्या भव्य अशा मंदिराचे काम हाती घेतले आहे. यास जवळपास १२५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

या मंदिराच्या उभारणीसाठी समाजातील अनेक भक्तांनी आणि उद्योजक , दानशूर मंडळींनी मदतीचा हात पुढे केला आहे. आज दिनांक १६ फेब्रुवारी रोजी राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्तिगत १ कोटी रुपये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिरासाठी देण्याचे केले जाहीर केले आहे.

Google Ad

आज तानाजी सावंत हे ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स, पुणे येथे एका खाजगी कार्यक्रमाकरीता उपस्थित होते, या कार्यक्रमात ह भ प पंकज महाराज गावडे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिर व त्याचे चालू असलेले काम याविषयी माहिती दिली, तेथे विचार व्यक्त केल्यावर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी त्यांचे भाषण अगोदर झाले होते तरी देखील गावडे महाराज यांच्याकडून माईक घेतला आणि महाराजांनी मांडलेल्या विचारांनी प्रभावित होऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे श्री क्षेत्र भंडारा डोंगर मंदिरासाठी व्यक्तिगत त्यांचे ऑर्गनायझेशन कडून १ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले.

ह भ प पंकज महाराज गावडे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे होणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिराकरिता त्यांच्या कीर्तन सेवेत मिळणारे सर्व मानधन त्यांनी या अध्यात्मिक कार्या करीता देणार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे अखिल वारकरी संप्रदायाला त्याच्याबद्दल प्रचंड अभिमान आहे आणि महाराष्ट्रात इतके मंडळी असताना हे कार्य करण्यासाठी ते पुढे आल्याने वारकरी संप्रदायात त्यांच्या नावाची चर्चा आहे.

पंकज महाराज गावडे यांनी केलेल्या आवाहनास आजपर्यंत अनेकांनी देणगीच्या रुपात खूप मोठी मदत दिली आहे, आणि मदतीचा ओघ अजूनही चालू आहे.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!