Categories: Editor Choice

नवी सांगवीतील कृष्णा चौक येथे माजी नगरसेवक शंकर पांडुरंग जगताप यांच्या शुभहस्ते डाक विभागाच्या विमा योजनेचा प्रारंभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २९ जुलै) : भारतीय डाक विभागाने ‘टाटा एआयजी’च्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करून प्रतिवर्ष २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्त्यात १० लाख रुपयांचे विमा कवच योजना चालू केली आहे. याचे उद्घाटन माजी नगरसेवक शंकर पांडुरंग जगताप (निवडणूक प्रमुख भाजप चिंचवड विधानसभा) यांच्या शुभहस्ते भाजपच्या कृष्णा चौक येथील कार्यालयात करण्यात आले.

यावेळी नदाफ सी एम उपविभागीय डाक निरीक्षक, मनोज राठोड पोस्टमन व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी या योजनेची माहिती घेऊन विमा खाते उघडून घेतले.

टपाल विभागाने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही नवीन योजना आणली आहे. ही योजना १८ ते ६५ वर्षे वयोगटांतील व्यक्तींसाठी आहे.

काय आहे योजना :-

१. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, तसेच त्याला अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल.

२. यासह या विम्यामध्ये उपचारांसाठी रुग्णालयात भरती झाल्यास ६० सहस्र रुपयांपर्यंतचा व्यय, तर रुग्णालयात भरती न होता घरी उपचार घेतल्यास ३० सहस्र रुपयांपर्यंत रक्कम मिळण्यासाठी दावा करता येईल. रुग्णालयाच्या व्ययासाठी १० दिवस प्रतिदिन १ सहस्र रुपये मिळतील.

३. या विम्याच्या अंतर्गत अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या अंतिम संस्कारासाठी ५ सहस्र रुपये, तर तिच्या किमान २ मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.

४. या योजनेचा कालावधी एक वर्षाचा असून एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षीसाठी विमा योजनेचे जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात जाऊन नूतनीकरण करता येणार आहे.

५. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचे ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’त खाते असणे आवश्यक आहे. ते नसेल, तर नव्याने खाते उघडून या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

🔴योजनेचा लाभ घेण्याकरीता येथे करा संपर्क :-

▶️भाजपा जनसंपर्क कार्यालय सांगवी काळेवाडी मंडल , चंद्ररंग आर्केड , कृष्णा चौक , नवी सांगवी , पुणे – ४११०६१ संपर्क : ७५७५९८११११

▶️ आमदार जगताप लक्ष्मण पांडुरंग संपर्क कार्यालय , जगताप पाटील कॉम्पलेक्स , छत्रपती शिवाजी चौक , पिंपळे गुरव , पुणे , ४११०६१
संपर्क : ७५०७४१११११

टीप :- हे धोरण संपूर्ण किंवा काही प्रमाणात किंवा खर्चाच्या परिणामी कोणत्याही खालील या व्यक्ती ना लागू होणार नाही.

1. साहसी खेळांमध्ये सहभाग , 2. सैन्य , नौदल , हवाई दल आणि पोलिस दलाच्या कोणत्याही शाखेशी संबंधित ग्राहक ,
3. कोणतीही पूर्व विद्यमान स्थिती ,
4. उपस्थित फिजिशियन जो असेल ( B ) विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या कुटूंबाचा जवळचा सदस्य स्वत कुटुंबातील जवळचा सदस्य .
5. आत्महत्या ,
6. मच्छर चाव्याव्दारे ,
7. औषधे , अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याने ,
8. वास्तविक किंवा प्रयत्न केलेल्या गुन्हेगारी , दंगल , गुन्हा , गैरवर्तन ,
9 . कोणत्याही विमान किंवा शेड्यूल एअरक्राफ्टवरील क्रूचे सदस्य ,
10. कोणत्याही स्फोटक आण्विक उपकरणांचे किरणोत्सर्गी , विषारी , स्फोटक किंवा इतर धोकादायक गुणधर्म , 11. वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसलेल्या रुग्णालयात कैदेत , 12. बाळंतपणामुळे किंवा गर्भधारणेमुळे होणारे कोणतेही नुकसान ,
13. कोणत्याही ड्रायव्हिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्ती ( व्यावसायिक ड्राइव्हर्स ) 14. युद्ध किंवा युद्ध , आक्रमण , परदेशी शत्रूची कृती ,
15. ऑस्टिओपोरोसिसमुळे होणारे कोणतेही नुकसान ,
16. कोणत्याही प्रकारच्या खाणकामासह असोसिएशन .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago