Google Ad
Editor Choice Maharashtra

स्वखर्चाने जनसेवेसाठी बार्शी येथे १००० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करणारे … महाराष्ट्रातील एकमेव आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

महाराष्ट्र 14 न्यूज : आमदार तानाजी सावंत यांनी ग्रामीण भागात कोवीड केअर सेंटर सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागाच्या दृष्टीने चांगली आरोग्य व्यवस्था निर्माण झाल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. बार्शी येथील जेएसपीएम ग्रुप संचलित भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात एक हजार खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटरचे नगर विकास तथा सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते (ता.०७) शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार ‘तानाजी सावंत’ यांनी ग्रामीण भागात कोवीड केअर सेंटर सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागाच्या दृष्टीने चांगली आरोग्य व्यवस्था निर्माण झाल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. बार्शी येथील जेएसपीएम ग्रुप संचलित भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात एक हजार खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटरचे नगर विकास तथा सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते (ता.०७) शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

Google Ad

यावेळी मंत्री शिंदे म्हणाले की, बार्शी या ठिकाणी शिवसेनेचे आमदार तानाजीराव सावंत यांनी सोलापूर व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सोय करण्यासाठी बार्शी येथे एक हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी बेड मिळत नाहीत या तक्रारी आता कमी होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. कोविड केअर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असून महिला रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील फार मोठी अडचण दूर झाल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

याठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांच्या रक्ताच्या वेगवेगळ्या आठ चाचण्यासाठी रुग्णांचा खर्चही वाचणार आहे.या सगळ्या सोयीसुविधामुळे तात्काळ निदान होण्यास मदत होणार आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण यामुळे वाढेल असा विश्वास यावेळी मंत्री श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.

रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी योगाच्या प्रशिक्षित शिक्षकांची देखील या ठिकाणी टीम कार्यान्वित करण्यात आलेली आहे.हे सेंटर नैसर्गिक व मोकळ्या वातावरणात असल्याने रुग्ण लवकर बरा होऊन घरी जाण्यासाठी फायदा होणार आहे.आमदार ‌सावंत यांनी अशा प्रकारची व्यवस्था करून शासनाला हातभार लावण्याबरोबरच रुग्णांना खरोखरच आरोग्यदायी दिलासा दिल्याचे गौरवोद्घागार श्री. शिंदे यांनी काढले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

209 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!