Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची अशी आहेत कोटीच्या कोटी उड्डाणे … सुमारे ४८ कोटी १६ लाख रुपये खर्चास मान्यता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ४ ऑगस्ट २०२१) : महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या झालेल्या आणि  येणा-या सुमारे ४८ कोटी १६ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा  पार पडली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

प्रभाग क्र.१४ आकुर्डी येथील विवेकनगर भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे अंतर्गत विद्युत विषयक कामे करण्याकामी येणा-या ३१ लाख ९२ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Google Ad

कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव  लक्षता घेता अत्यावश्यक बाब म्हणून ६६ बेड करीता  येणा-या ९२ लाख ८८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

रावेत अशुध्द जलउपसा केंद्र येथिल पवना नदीमधील आणि इनटेक चॅनेल मधील गाळ कचरा काढण्याकामी येणा-या ४६ लाख १७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
गणेशनगर थेरगाव पंप हाऊस येथील पंपाची क्षमता वाढविणे तसेच अतिरिक्त पंप बसिवण्याकामी येणा-या ६५ लाख ५७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्र टप्पा क्र १ ते ४ पंपमधील गाळ काढणेकामी येणा-या २८ लाख ३ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१६ मधील रावेत भागातील रावेत गावठाण ते समीर लॉन्स  पर्यंत १८ मीटर डी.पी. रस्ता आणि इतर रस्ते विकसित करणेकामी येणा-या १ कोटी ६८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

अजमेरा टाकी परिक्षेत्रातील पाण्याच्या टाक्यांचे परिचालन करणे  व  किरकोळ दुरूस्तीची कामे करण्याकामी येणा-या ७७ लाख ४९ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१३ ओटास्किम येथील विविध झोपडपट्टयामधील अंतर्गत गल्ल्यामध्ये स्ट्रॉर्म वॉटर आणि इतर स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकामी येणा-या ५२ लाख ५६ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१३ सेक्टर क्र.२२ निगडी येथील बुध्दनगर, विलासनगर व सभोवतालच्या परिसरातील गटर पाथवे व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणा-या २५ लाख ४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
दिघी बोपखेल प्रभाग क्र.४ येथील बोपखेल रामनगर ते बोपखेल गावठाण रस्त्यास फुटपाथ व दुभाजक करण्याकामी येणा-या ५५ लाख ३१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

कोविड-१९ चे लसीकरण केंद्र उभारण्याकामी इच्छुक संस्थांकडून, ज्यांना वैदयकीय सेवेअंतर्गत मनुष्यबळ पुरविण्याचा अनुभव आहे.  अशा संस्थांकडून सदर कामकाजाकरीता मनुष्यबळ उपलब्ध करण्याकामी येणा-या ७५ लाख २२ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१८ मधील दर्शन नगरी ते संत गार्डन बिल्डींग पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसीत करण्यासाठी येणा-या १ कोटी ९९ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

नेहरुनगर मुख्य रस्त्यावरील आरक्षण क्र. ६६ मध्ये पी.एम.पी.एम.एल.साठी बस डेपो बांधणे आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या ६ कोटी ७५ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

77 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!