Google Ad
Editor Choice

पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकातील एसटी कर्मचाऱ्यांनी केले आज अर्धनग्न होत आंदोलन 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ नोव्हेंबर) : महाराष्ट्रातील  एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्याप संपलेला नाही. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही एसटी कामगार कामावर न परतल्यानं प्रवाश्यांची मोठी गैरसोय निर्माण झाल्याचं दिसून आले आहे. शहरातील स्वारगेटबस आगारात आजही एकही बस आलेली नाही. या डेपोतून लांबपल्ल्याच्या कोणत्याही गाड्या आलेलया नाहीत. तसेच यामुळे प्रवाश्यांची तारंबळ उडाली आहे. दूरच्या प्रवासासाठी निघालेल्या प्रवासी अद्यापही स्थानकातच अडकून पडले आहेत. तर जिल्हातंर्गत प्रवासाच्या बसेसही आगारातून बाहेर पडलेल्या नाहीत. स्वारगेट शिवाजीनगरसह शहरातील 13बस डेपोतील एसटीची वाहतूक पूर्ण बंद आहे.

राज्यात बेमुदत संपावर असलेले एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. संपाच्या दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज अर्धनग्न होत आंदोलन केलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे. आता 30 महामंडळांचे राज्य सरकारमध्ये विलीकीकरण करण्यात आले. मग एसटीचे का नाही? जोंपर्यंत आमची मागणी मान्य होत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याची माहिती आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

Google Ad

उच्च न्यायालयाचा आम्ही कोणत्याही प्रकाराचा अवमान करत नसून, आमचं आंदोलन हे जीआरमधील तरतुदी बाबत आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आमचा समावेश करावा, त्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच आम्हालाही वेतन द्यावे एवढीच आमची मागणी आहे. आमची मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार असून आमच्या कुटुंबियांना घेऊन रस्त्यावर उतरू अशी भूमिका आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!