Google Ad
Editor Choice

औंध हॉस्पिटल येथेल वाल्मिकी पंचायत मित्र मंडळ यांच्या कडून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑगस्ट) : श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा’ अशी प्रार्थना करत अत्यंत भक्तिमय वातावरणात, उत्साहात पिंपरी चिंचवड शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी आज साजरी झाली. कोविडमुळे दोन वर्षे जन्माष्टमीचा उत्सव मर्यादित स्वरूपातच साजरा करावा लागला होता. त्यामुळे यंदा जन्माष्टमीचा उत्साह अधिक होता.

Google Ad

औंध हॉस्पिटल येथेल वाल्मिकी पंचायत मित्र मंडळ यांच्या कडून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. 18 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिराला सुंदर फुलांची सजावट करण्यात आली.मागील दोन वर्षां मध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव छोट्या प्रमाणात मोजक्याच लोकसंख्येत साजरा करण्यात आला होता पण या वर्षी शासनाने सर्व परवानगी दिल्यामुळे संध्याकाळी 8 वाजता निशान यांची पूजा करण्यात आली.

संध्याकाळी 9 वाजता वीर गोगादेव भजन कीर्तन करण्यात आले तर रात्री 12 वाजता श्रीकृष्ण भजन व जन्मोत्सव मोठ्या आनंद उत्साहात नाचत गात साजरा करून आलेल्या सर्व भाविकांना प्रसाद देण्यात आला.त्याप्रसंगी माजी.नगरसेवक धनराज बिर्धा,संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे,सामाजिक कार्यकर्ते पंकज सारसर,कार्याध्यक्ष सत्यवान ग्यानी अध्यक्ष किशोर लालबेगी,उपाध्यक्ष राजेंद्र खेराले,महासचिव राजबाबू सरकनिया,सचिव सतीश चंडालिया,सहसचिव हिरा वाघेला,खजिनदार राजू बेद आधी मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!