Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड मतदारसंघात पदवीधर मतदार नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहर भाजपच्यावतीने येत्या रविवार ( दि .१ नोव्हेंबर ) रोजी संपूर्ण शहरात साधारण शंभर ठिकाणी’ पदवीधर मतदार नोंदणी ‘ महाअभियान राबविण्यात आले. या अभियानाद्वारे एकाच दिवशी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून प्रभाग स्थरावर हौसिंग सोसायटी मध्ये मतदारांची नोंदणी करताना दिसत होते. चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघात हे नोंदणी अभियान राबविण्यात आले.

यामध्ये सांगवी , नवी सांगवी, पिंपळे गुरव, राहटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, वाकड , पिंपळे निळख, थेरगाव, चिंचवड गाव या भागात मतदार नोंदणी करीता तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला. हे पदवीधर मतदान नोंदणी अभियान रविवार दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत राबविण्यात आले,

Google Ad

भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभागस्थरावर स्थानिक नगरसेवक, मंडल पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ति केंद प्रमुख यांच्या मदतीने यावेळी पदवीधरांचे फॉर्म भरून नोंदणी करण्यात आली, या नोंदणीच्या ठिकाणची आमदार लक्ष्मण जगताप यांनी भेट देऊन स्वतः पाहणी केल्याचे यावेळी दिसून आले.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अशा पाच जिल्ह्यांचा मिळून हा मतदारसंघ बनला आहे. गेली दहा वर्षे या मतदार संघातून भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रतीनिधित्व करत होते. मात्र, सध्या ते कोथरुड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेतील त्यांची जागा ऑक्टोबर २०१९ पासून रिक्त आहे. आता आगामी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीत कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देतो, हा औत्सुक्याचा विषय आहे, उमेदवार कोणीही असला तरी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या हातात ही निवडणूक असणार असल्याने, उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींना या गोष्टींचा विचार करावा लागणार हे मात्र नक्की.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!