Google Ad
Editor Choice

जानम समझा करो’ व ‘वाजतंय ते गाजतंय’ या नाटक,सांगीतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ ऑगस्ट) : स्वर सर्वेश निर्मित आणि सर्वज्ञ नाट्य संस्था प्रस्तुत ‘जानम समझा करो’ आणि ‘वाजतंय ते गाजतंय’ या नाटक,सांगीतिक कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग आज प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे पार पडला.हे नाटक आणि हा सांगीतिक कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस उतरला असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.हे दोन्ही कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य होते.या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व नाटय परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

जानम समझा करो‘ हे एक धम्माल म्युझिकल – डान्सीकल फर्सिकल कॉमेडी नाटक आहे. या नाटकाची निर्मिती श्रावणी संतोष चव्हाण यांची असून लेखन भाऊसाहेब पवार यांनी केले आहे. तर दिग्दर्शनाची धुरा विनोद खेडकर यांनी उचललेली आहे. कलाकार सागर पवार, तृप्ती मांढरे, अश्विनी थोरात, शुभम मांढरे, विनोद खेडकर आणि चेतन चावडा यांनी अप्रतिम अभिनय केला आहे.

Google Ad

वाजतंय ते गाजतंय‘ गीत, संगीत आणि नृत्याने सजलेला नाट्यमय आविष्कार आहे. श्रावणी संतोष चव्हाण यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन आणि नृत्याची धुरा अर्जुन दौलत जाधव यांनी सांभाळली आहे. ‘नाचायां सारे पोरं या गणपती बाप्पा मोरया’ या गाण्याने निर्माते संतोष चव्हाण यांनी नृत्य आविष्कार सादर केला.संगीत संयोजन विनायक वाघचौरे यांचे असून नेपथ्य श्रीकांत पोटे यांचे आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री अनुपमा जोशी, संध्या नरळे, स्नेहा, मनुजा देशपांडे, मिथिला, कार्तिका बोराडे, सुकन्या, माधुरी, वैशाली, महेंद्र भांगे, शुभ रामदास, श्रावण डाखोळे, अमोल आर्या, हर्षल जाधव, नरेश पाटील,सुरभी सावंत यांचा कलाविष्कार पाहायला मिळत आहे.तसेच या वेळी सतीश परदेशी व संतोष चव्हाण यांनी कॉमेडी स्किट सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे निर्माते संतोष चव्हाण आणि स्त्री वेशभूषेमध्ये स्त्री पात्र साकारणारा सचिन वाघोडे यांनी बहारदार परफॉर्मन्स दिला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!