Google Ad
Editor Choice india

आधार कार्ड सुरक्षित करण्यासाठी UIDAI ची खास सुविधा … ‘ या ‘ सोप्या मार्गाने करू शकता Aadhaar number लॉक

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतातील व्यक्तीचे एक महत्वाचे आयडी प्रूफ म्हणजे आधार कार्ड (Aadhaar Card) होय. ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा अधिक उपयोग आहे. अनेक सरकारी आणि खासगी कामात आधार कार्डचा वापर आवश्यक असतो. आधार कार्डचा उपयोग बँकेमध्ये, मोबाईलसाठी, तसेच कोणत्याही कामात आवशयक असतो. यामुळे आता व्यक्तीचे आधार कार्ड सुरक्षित आहे अथवा नाही यांची पुष्टी करणे आवश्यक असते.

आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र असल्याने त्याचा उपयोग बँकेत अधिक प्रमाणात होतो. बँकेला आधार नंबर लिंक असतो. म्हणून डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढल्यापासून गुन्हेगारीचे स्वरुपही वाढायला लागले आहे. आधार कार्डचा वापर अन्य व्यक्तीकडून होत नाही ना?

Google Ad

याचं निरीक्षण करणे अतिशय महत्वाचे आहे. चुकून जरी आपले आधार कार्ड कोणाकडे गेले तरी आपली गोपनीय माहिती लीक होऊ शकते. हे संकट घालवण्यासाठी आता UIDAI ने एक खास सेवा समोर आणली आहे. यामुळे व्यक्ती आपला आधार कार्ड लॉक करू शकते. तसेच महत्वाचे म्हणजे लॉक केलेले आधार कार्ड अनलॉक करण्याची सुविधा देखील UIDAI कडून उपलब्ध केली गेली आहे.

▶️कसे कराल आधार कार्ड लॉक?
यावरून आधार कार्ड (Aadhaar Card) लॉक करण्यासाठी आपल्या फोनवरून GETOTP लिहून १९४७ वर मॅसेज पाठवणे आणि त्यानंतर OTP येईल, यानंतर LOCKUID आधार क्रमांक पाठवणे आणि पुन्हा १९४७ वर पाठवणे. अशी प्रक्रिया पूर्ण केल्यावर व्यकितच आधार कार्ड क्रमांक लॉक होणार आहे. तो आधार कार्ड लॉक झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या संमत्तीशिवाय कोणीही तो आधार कार्ड क्रमांक वापर करू शकणार नाही. अथवा वापरता येणार नाही. मुख्यतः म्हणजे हॅकर्स सुद्धा आधार तपासणी करू शकत नाही. या उपयुक्त सुविधेमुळे व्यक्तीचे आधार कार्ड सुरक्षित राहणार आहे.

▶️कसे कराल आधार कार्ड अनलॉक?
आधार कार्ड (Aadhaar Card) अनलॉक करण्यासाठी व्यक्तीला फोनवरून १९४७ पर्यंत GETOTP आधार क्रमांक लिहणे. OTP आल्यानंतर त्या अनलॉकयूआडी आधार क्रमांकावर लिहा आणि ते पुन्हा १९४७ क्रमांकावर पाठवा. असे केल्याने आपले Aadhaar Card अनलॉक होईल.

या दरम्यान, अशी प्रक्रिया UIDAI च्या संकेतस्थळावर जाऊनही ही प्रक्रिया केली जाते. यासाठी आधार कार्ड सेवा पर्यायांमधील Lock / Unlock बायोमॅट्रिकवर क्लिक करावे. चेकबॉक्सला सिलेक्ट करावे. यानंतर १२ अंकी आधार कार्ड नंबर सादर करून कॅप्चा भरावा. यानंतर मोबाइलवर OTP येण्यासाठी क्लिक करावे.

यानंतर नोंदणीकृत मोबाइलवर OTP येईल. तो सादर केला की, Enable locking feature करावे. यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक होईल. तसेच, लॉक झालेले आधार कार्ड अनलॉक करण्यासाठी हीच पद्धत फॉलो करावयाची आहे. केवळ disable locking feature हा पर्याय सिलेक्ट करावायचा आहे. यानंतर लॉक झालेले आधार कार्ड अनलॉक होऊ शकेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!