Google Ad
Editor Choice

चिंचवड येथील काळभोर नगरमधील नाल्यात काही कंपन्यानी सोडले रासायनिक मिश्रीत पाणी … मनपाचा पर्यावरण विभाग करतोय काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ सप्टेंबर) : चिंचवड येथील काळभोर नगरमधील नाल्यात काही कंपन्यानी रासायनिक पाणी सोडले आहे, त्यामुळे आसपासच्या रहिवाशांना तसेच महानगरपालिकेची शाळा असल्याने विदयार्थांना श्वसनाचा त्रास होत आहे, परिणामी सर्वच वयोगटातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून गंभीर बनला आहे, काळभोर नगरमधील एश्वर्यम,सूर्योदय या गृहनिर्माण संस्थामध्ये प्रत्येकी सातशे नागरिक राहत असून, तीन ते चार हजार नागरिक वास्तव्यास आहे,

हे सर्व रहिवाशी दिवसभर दरवाजे,खिडक्या बंद करून ठेवतात, येथील नागरिकांनी 2015 साली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाकडे तक्रार केली असता तेथील अधिकार्यांनी येथे येऊन पाहणी केली, पंरतू त्यानंतर परत येतो सांगून प्रदूषण मंडळाचे अधिकारी जे गायब झाले ते आजतागायत येथे फिरकले नाहीत,
नागरिकांना धोकादायक रासायनामुळे भविष्यात आरोग्याचा धोका निर्माण होण्याची चिंता सतावत आहे,

Google Ad

चिंचवड येथील काळभोर नगरमधील नाल्यात काही कंपन्यानी सोडले रासायनिक मिश्रीत पाणी … मनपाचा पर्यावरण विभाग करतोय काय? नागरिकांकडून असा प्रश्न विचारला जात आहे.

त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपाचे संजय कुलकर्णी मुख्यकार्यकारी अधिकारी पर्यावरण विभाग यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन कारवाई करावी व  येथे रासायनिक पाणी निर्माण करणार्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तेथील रासायनिक पाणी आपल्या व आयुक्तांच्या कक्षात फेकण्यात येईल असे प्रदीप गायकवाड उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!