महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११एप्रिल) : आज ११ एप्रिल २०२३. आज भारतीय इतिहासातले थोर महापुरूष महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुण्यात झाला. तिथेच त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले. समाजाला शिक्षित केल्याशिवाय समाजातून जातीव्यवस्था किंवा भेदाभेद मिटू शकणार नाही हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी चांगलेचं हेरले होते.
एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे अवघ्या कुटुंबाचं शिक्षण हे महात्मा फुले यांना समजलं होतं. त्यासाठीच त्यांनी भारतातली पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडेवाड्यात सुरू केली. थोर समाजसेवक, क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे काही सुविचार आज आपण पाहाणार आहोत.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे सुविचार
विद्येविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्येने केले.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.
नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे.
भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसच आहे.
समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.
ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात.
जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.
जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे.
मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा, ज्योती म्हणे.