Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड टीम मधील सॉफ्ट बॉल प्लयेर … ‘अनोश अनिल कांबळे’ यांची महाराष्ट्र टीम मध्ये नॅशनल स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ नोव्हेंबर) : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ च्या अनुषंगाने वेगवेगळ्या भागात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा प्रबोधनी विद्यालय नेहरूनगर येथे आठवी मध्ये शिकत असून त्याची राज्यस्तरीय सॉफ्ट बॉल स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड संघामध्ये निवड करण्यात आली होती, हा संघ औरंगाबाद येथे 16 ते 18 नोव्हेंबर 28 वी सब ज्युनिअर सॉफ्ट बॉल स्पर्धा साठी गेला होता, तिथे 19 संघ वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले होते. या सर्व टीम मधून पिंपरी चिंचवड टीम मधील अनोश अनिल कांबळे यांची महाराष्ट्र टीम मध्ये नॅशनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

Google Ad

मैदानी सांघिक खेळाचा एक प्रकार. सॉफ्टबॉलला प्ले ग्राऊंड बॉल असेही म्हणतात. या खेळाची मूलतत्त्वे, स्वरुप, खेळण्याची पद्घती इ. बाबतींत बेसबॉल या खेळाशी ह्याचे खूपच साम्य आहे. हिवाळ्यातही बेसबॉल खेळता यावा, म्हणून जॉर्ज डब्ल्यू. हॅन्‌कॉक याने शिकागो येथे १८८७ मध्ये अंतर्गेही (इन्‌डोअर ) बेसबॉलचा प्रकार शोधून काढला, त्यातूनच पुढे सॉफ्टबॉल हा खेळ उगम पावला. या खेळाचे प्राथमिक नियमही हॅन कॉकनेच तयार केले. १८९५ मध्ये मिनीअ‍ॅपोलिसच्या लूईस रॉबरने ह्या खेळाला बहिर्गेही मैदानी खेळाचे स्वरुप प्राप्त करुन दिले. सध्याचा खेळ रॉबरच्या पद्घतीनेच खेळला जातो.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!