लेवा भ्रातृमंडळ – पिंपळे सौदागर, पुणे यांच्या समाजकार्यातून कोविड काळात गरजू कोविड ग्रस्तांना दिलासा !

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.१५ मे) : लेवा भ्रातृमंडळ , पिंपळे सौदागर , पुणे यांचेतर्फे सध्याच्या कोविड काळात गरजू कोविड ग्रस्तांना तातडीने दिलासा देता यावा म्हणून ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे . संस्थेने त्यासाठी सुरवातीस दोन १० लिटर क्षमतेचे ऑक्सिजन काँसनट्रेटर्स खरेदी केले आहेत . यासाठी मंडळाच्या आवाहनानुसार अमेरिकेतील समाजबांधव अशोक चौधरी यांनी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले ,त्याबद्दल मंडळ त्यांचे ऋणी व्यक्त केले .

याच बरोबर मंडळाने २ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर्सची व्यवस्था केलेली आहे . कोविडग्रस्त गरजू लेवा समाजबांधवांना हि सुविधा मोफत उपलब्ध करणेत येणार आहे . उपलब्धतेनुसार अन्य समाजबांधवाना काही अटीवर या सुविधा उपलब्ध असणार आहेत . लवकरच मंडळ कोविडग्रस्ताना आवश्यक अद्ययावत माहिती व मदत देण्यासाठी कोविड टास्क फोर्स सुरु करणेच्या विचारात आहे . वरील सुविधांचे लोकार्पण आज पिंपळे गुरव येथील प्रसिद्ध उद्योजक व मा . नगरसेवक शंकरशेठ जगताप , पिंपळे सौदागर येथील नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांचे हस्ते करण्यात आले.

आज दिनांक १५ मे रोजी सुदर्शन नगर गल्ली नंबर ३ येथील परम पूज्य भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ यांच्या विरंगुळा केंद्रात सकाळी ९ वाजता हा सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध उद्योजक व मा . नगरसेवक शंकरशेठ जगताप , नगरसेवक शत्रुघ्न काटे , लेवा भ्रातृमंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे , कार्याध्यक्ष कृष्णाजी खडसे , सचिव निर्मल गाजरे , कार्याध्यक्ष संदीप भोळे , पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली जगताप , हरिभाऊ पाटील , ओम खडसे , अविनाश खडसे आणि उत्कर्ष खडसे अशा मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि कोरोना प्रोटोकालचे पालन करीत हा समारंभ पार पाडण्यात आला .

नुकतीच मंडळाने शीतपेटी खरेदी केली असून एखाद्या मयताचे नातेवाईक दूरदेशी रहात असल्यास / येण्यास वेळ लागणार असल्यास अशा वेळी मृतदेह जास्त वेळ जोपासण्यासाठी हि शीतपेटी उपयुक्त ठरते . समाजबांधवाना हि सुविधासुद्धा मोफत उपलब्ध असणार आहे . मान्यवरांना हि सुविधासुद्धा दाखवण्यात आली . याप्रसंगी बोलतांना माननीय शंकर जगताप आणि नगरसेवक श्री शत्रुघ्न ( बापू ) काटे यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक व अभिनंदन केले.सध्याच्या कोविड परिस्थितीत मंडळाने उपलब्ध केलेली हि सुविधा खूपच महत्वपूर्ण आहे असेही ते म्हणाले . दोन्ही मान्यवरांनी मंडळ कार्यास शुभेच्छा देवून मंडळास आवश्यक तेव्हा सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . गरजू समाज बांधवांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करणेत आले आहे .

 

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago