Google Ad
Editor Choice

सक्षम, सुदृढ आणि एकसंघ राष्ट्राची निर्मिती … भारताला असेच बलशाली राष्ट्र बनविण्याकरीता सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ५ सप्टेंबर २०२२:- मानवी मुल्ये सर्वात श्रेष्ठ असून त्याची जपणूक करण्यासाठी आपसात सद्भावना निर्माण करणे गरजेचे आहे. त्यातून सक्षम, सुदृढ आणि एकसंघ राष्ट्राची निर्मिती होते. भारताला असेच बलशाली राष्ट्र बनविण्याकरीता प्रत्येकाने सद्भावना वृद्धींगत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे असा सूर सामाजिक ऐक्य पंधरवडा निमित्ताने झालेल्या विशेस कार्यक्रमात उमटला.

युवा व क्रीडा मंत्रालय भारत यांच्या निर्देशानुसार दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट २०२२ हा जयंती दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून २० ऑगस्ट २०२२ ते ५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याच्या सूचना होत्या.

Google Ad

त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सर्वधर्मीय सद्भावना विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास हिंदु धर्मजागरण संस्थेचे संयोजक माधव खोत, मौलाना कारी अब्दुल इकबाल, बौद्ध भन्ते धम्मानंदजी आणि शिख धर्मगुरू भाई दर्शनसिंग तसेच महापालिकेचे उप आयुक्त संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक,उपस्थित होते.

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी आम्ही काम करू. आमच्यातील वैयक्तिक किंवा सामुहिक सर्व प्रकारचे मतभेद आम्ही हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून संविधानिक मार्गानी सोडवू अशी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रतिज्ञाचे वाचन केले.

माधव खोत यांनी मार्गदर्शन करताना सर्वधर्मीय समाज टिकावा यासाठी सर्वधर्मियांनी एकत्र येणे गरजेचे असून आपापसात संवाद राखणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. दोन धर्मांमध्ये जातीय वाद गैरसमजातून निर्माण होत असतात यासाठी देश डोळ्यासमोर ठेवून परस्परांशी समन्वय राखल्यास भारत वैभवशाली व समृद्ध होण्यास मदत होईल असे सांगितले.

भन्ते धम्मानंदजी म्हणाले नागरिकांमधील कलह कमी करण्यासाठी परस्परांप्रती सद्भावना असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सर्वांशी माणुसकीने वागले पाहिजे, माणसातील द्वेष, वैरभाव दूर करून माणसाने माणसांशी विनम्रतेने वागले पाहिजे, संविधांनातील आधारभूत मानवी मुल्ये प्रत्येकाने जपावीत असे मार्गदर्शन केले.

भाई दर्शनसिंग म्हणाले सर्वांचे कल्याण व्हावे, सर्वजण सुखी समाधानी व सुरक्षित रहावे अशी गुरुनानक यांची शिकवण असून या आधारे सर्वांनी परस्परांबद्दलची भावना जोपासली पाहिजे असे ते म्हणाले.

भारतीय नागरिक परदेशी गेल्यानंतर त्यांची धर्मानुसार नव्हे तर भारतीय म्हणूनच ओळख होते. मानवता हीच सर्वश्रेष्ठ असुन सर्वांनी इतरांप्रती माणुसकी जपली पाहिजे, दिवाळी ईद सारख्या सणातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश एकमेकांत दिला जातो अशा प्रकारे विविधतेने नटलेल्या या देशाचा अभिमान वाटतो असे मौलाना कारी अब्दुल इकबाल यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!