Google Ad
Editor Choice Health & Fitness

म्हणून नाही घेतली कोरोनाची लस … ‘रामदेव बाबा’ यांनी दिले हे स्पष्टीकरण!

महाराष्ट्र 14 न्यूज : अॅलोपॅथी वादानंतर आता बाबा रामदेव पुन्हा चर्चेत आहेत. आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस का घेतली नाही याचे स्पष्टीकरण बाबा रामदेव यांनी दिले आहे. तसेच आपल्यात आयुर्वेद आणि योगाची शक्ति असल्याचेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बाबा रामदेव सहभागी झाले होते. तेव्हा बाबा रामदेव म्हणाले की, जो पर्यंत देशातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात नाही तोपर्यंत मी लस घेणार नाही. सध्या लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी नागरिकांना लस देण्याची गरज आहे बाबा रामदेव म्हणाले. तसेच जेव्हा मी म्हणतो की कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाला यावर वाद होतो.

Google Ad

पण मी म्हणतो की सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन आयुर्वेद आणि योगाचा डबल डोस घेणे गरजेचे आहे. त्यानंतर मनुष्याच्या शरीरात एक सुरक्षाचक्र तयार होईल आणि हे चक्र कुठलाही विषाणू भेदू शकणार नाही असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. सध्या माझ्या शरीरात योग आणि आयुर्वेदची शक्ति आहे असेही बाबा रामदेव म्हणाले. तसेच सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. अॅलोपॅथीला एक मूर्ख आणि बिनकामाचे विज्ञान आहे असे बाबा रामदेव यांनी म्हटले होते. तसेच रेमडेसिवीर, फेविफ्लू आणि डीसीजीआयने मंजुरी दिलेल्या दुसर्याम औषधांमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या विधानाने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि आरोग्य मंत्र्यांच्याच प्रतिष्ठेला आव्हान दिले होते. त्याचबरोबर लाखो लोकांचे जीव धोक्यात टाकले आहे. सरकारने रामदेवबाबांविरुद्ध कारवाई न केल्यास आपण कायदेशीर कारवाईचा मार्ग पत्करणार असल्याचा इशाराही आयएमएने दिला होता.

नंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना पत्र लिहिले होते. यावर बाबा रामदेव म्हणाले की ‘माध्यमांमध्ये जे माझे वक्तव्य दाखवले होते ते मी व्हॉट्सऍपवरील एक मेसेज वाचत. होतो माझ्या या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. ‘ तसेच आपण कुठल्या विज्ञानाच्या किंवा अॅलोपॅथीच्या विरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

41 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!